काही कोडी ही फक्त मजेशीर नसतात, तर त्यातून आपल्या बुद्धीचातुर्याची परिक्षा ही घेतली जाते. आपली बुद्धी ही त्यातून तल्लक होते. अशा पद्धतीची कोडी सोडवल्याने आपली विचार करण्याची क्षमता ही विकसीत होते. समस्येचे निराकरण करण्याची शैलीही त्यातून वाढीस लागते. ऐवढचं नाही तर आपली स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासही त्यातून मदत होते. हा एक मानसिक व्यायाम आहे. अशा कोड्यामधून माणूस एक वेगळ्या प्रकारचा विचार करतो. अशा पद्धतीची कोडी सोडवल्याने बुद्धी ही तल्लक आणि सतर्क होते. त्यातून एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे, त्यात एक नाही तर अनेक घरं दिसत आहेत. बरं ती घरं एकसारखीच दिसणारी आहेत. त्यात वेगळेपण ओळखणे तसं कठीण आहे. पण त्यातला टाक्स थोडा वेगळा आहे. या घरांच्या गर्दीमध्ये एक मांजर एका ठिकाणी लपून बसली आहे. ती मांजर शोधण्याचे टास्क या फोटोतून देण्यात आले आहे. एक सारखी दिसणारी घरं आणि त्यात छोटीशी मांजर शोधणं म्हणजे मोठं आव्हानच आहे.
हे कोड नेटकऱ्यांसाठी कौतूकाचा विषय ठरलं आहे. त्यातली मांजर शोधणं हे तिस सेकंदाचं टास्क देण्यात आलं आहे. पण अनेकांना ही मांजर शोधण्यात तासनं तास गेले आहेत. तर काहींना ती मांजर शोधणं कठीण झालं आहे. पण काहींनी डोकं लावत काही सेंकदात मांजरीचा शोध लावला आहे. या फोटीचे निट निरिक्षण केले तर तुम्हाला ही ती काही सेकंदात नक्कीच शोधता येईल. तर मग व्हा, तयार आणि तीन सेकंदात ही मांजर शोधून दाखवा.