जाहिरात

हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात उंदीर चावल्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात उंदीर चावल्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

उंदीर चावल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जयपूरच्या सरकारी रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारासाठी ह मुलगा दाखल झाला होता.  मुलाच्या पायाच्या बोटाला उंदीर चावल्याचा आरोप आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र मुलाचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झाला नसून "सेप्टिसिमिया शॉक अँड हाय इन्फेक्शन"मुळे झाला असल्याचं रुग्णालयाचे म्हणणं आहे. राजस्थान सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे.

मुलाला 11 डिसेंबर रोजी येथील राज्य कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप जासुजा यांनी सांगितलं की, "मुलाला ताप आणि न्यूमोनियाही झाला होता. हाय इन्फेक्शन, सेप्टिसिमिया शॉकमुळे शुक्रवारी तयांचे निधन झाले."

(नक्की वाचा-  ED च्या छापेमारीनंतर व्यायसायिकाने पत्नीसह आयुष्य संपवलं; अखेरच्या चिठ्ठीत राहुल गांधींसाठी भावनिक मेसेज)

मुलाल उंदीर चावल्याची माहिती मिळताच उपचार सुरू केले. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जासुजा यांनी सांगितले. याप्रकरमी राजस्थानचे वैद्यकीय शिक्षण सचिव अंबरीश कुमार यांनी सवाई मान सिंग (एसएमएस) मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांकडून अहवाल मागवला आहे.

(नक्की वाचा-  अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला कॉन्स्टेबल अटकेत, भोंदू बाबाच्या टोळीशी कनेक्शन उघड)

एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही वेळातच मुलगा रडू लागला. त्याच्या कुटुंबीयांनी तपासणी केली असता उंदराच्या चाव्यामुळे त्याच्या एका पायाच्या बोटाला रक्तस्त्राव झाल्याचे दिसले. कुटुंबीयांनी तेथे उपस्थित नर्सिंग स्टाफला माहिती दिली, त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पायाला पट्टी बांधली.

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com