Patient Fell From Ambulance Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. माध्यमांवर व्हायरल होणारे काही व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्यांच्यही काळजाचाही ठोका चुकतो. सध्या एका ॲम्ब्युलन्सचा असाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही ॲम्ब्युलन्स महामार्गावरुन सुसाट वेगात धावत असतानाच त्याचा दरवाजा उघडून आतमधील रुग्ण बाहेर पडतो, महामार्गावर ॲम्ब्युलन्सच्या मागे धावणाऱ्या कारमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भरधाव ॲम्ब्युलन्स हायवेवर वेगाने धावताना दिसत आहे. अचानक धावत्या ॲम्ब्युलन्सचा मागचा दरवाजा उघडतो आणि आत असलेला रुग्ण स्ट्रेचरसहित थेट हायवेच्या मध्यभागी खाली कोसळतो. निष्काळजीपणाची हद्द म्हणजे ॲम्ब्युलन्स चालकाला त्याच्या वाहनातून रुग्ण खाली पडला आहे, याची जाणीवही झाली नाही. ॲम्ब्युलन्स त्याला तिथेच सोडून पुढे निघून गेली.
Expensive Apple: 'हे' आहे जगातील सर्वात महाग सफरचंद, एका सफरचंदाच्या किंमतीत येतील 10 लक्झरी कार
ॲम्ब्युलन्सधून खाली कोसळलेला रुग्ण स्ट्रेचरसहित हायवेवर तसाच पडून राहिला. सुदैवाने, या घटनेच्या वेळी मागून दुसरे कोणतेही वाहन वेगाने येत नव्हते, अन्यथा एक मोठा आणि जीवघेणा अपघात (Major Accident) झाला असता. ही दुर्घटना पाहून इंटरनेट युजर्सही हैराण झाले असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
तमिलनाडु के कून्नूर में दिल दहला देने वाला वाकया,
— Arzoo Alam (@ArzooAl34714966) November 10, 2025
एम्बुलेंस का दरवाज़ा खुला और मरीज़ स्ट्रेचर समेत सड़क पर गिर गया
लेकिन ड्राइवर को ज़रा भी खबर नहीं हुई, वो आगे बढ़ता रहा
ज़िंदगी बचाने वाली गाड़ी ही लापरवाही की मिसाल बन गई pic.twitter.com/QfFaD3GVAM
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'X' (ट्विटर) सह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने "जेव्हा जबाबदार व्यक्तीच झोपतात, तेव्हा असेच होते" असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने "दरवाजा उघडा कसा राहिला? हा मोठा प्रश्न आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच "ही तर निष्काळजीपणाची हद्द झाली!" अशा शब्दांत अनेकांनी ॲम्ब्युलन्स चालकावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, रुग्ण आणि त्याच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या निष्काळजी ॲम्ब्युलन्स चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world