जाहिरात

Viral Video: अरेरे! विराट कोहली ते धोनी..दिग्गज खेळाडूंकडून फक्त 50-50 रुपयांचा आहेर; VIDEO एकदा पाहाच

बक्षीस देणाऱ्यांनी  टीम इंडियामधील दिग्गज खेळाडूंच्या नावाने ही बक्षीसे जाहीर केली आहेत, ज्यामध्ये सचिन तेंडूलकरपासून ते तिलक वर्मापर्यंत सर्व आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे.

Viral Video: अरेरे! विराट कोहली ते धोनी..दिग्गज खेळाडूंकडून फक्त 50-50 रुपयांचा आहेर; VIDEO एकदा पाहाच

Indian Cricketers Viral Video: सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना.. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. थरकाप उडवणारे अपघात, मारामारी, लग्नातील गमतीजमतीसह शाळा, कॉलेजमधील तरुणाईच्या मस्तीचे असंख्य व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.सध्या सोशल मीडियावर असाच एका शाळेतील समारंभाच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये मुलांनी केलेला प्रताप पाहून तुम्हीही डोकं धराल.. काय आहे हे प्रकरण? वाचा सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या शाळा, कॉलेजमध्ये वार्षिक समारंभ, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ, ट्रेडिशनल डे, ट्रेडफेअर असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये मुलांच्या दमदार एन्ट्रीचे, स्टेजवरील डान्सचे अन् जुगलबंदीचे क्षण नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहेत. असाच एका मजेशीर व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे, ज्यामध्ये बक्षीस वितरण समारंभातील बक्षीस दात्यांची नावे ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल... 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका शाळेमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसत आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे यामध्ये बक्षीस देणाऱ्यांनी  टीम इंडियामधील दिग्गज खेळाडूंच्या नावाने ही बक्षीसे जाहीर केली आहेत, ज्यामध्ये सचिन तेंडूलकरपासून ते तिलक वर्मापर्यंत सर्व आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे.

नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!

विराट कोहली, रोहित शर्मा, तिलक वर्मा, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह,आर अश्विन संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, विरेंद्र सेहवाग,सचिन तेंडूलकर महेंद्रसिंग धोनी अशा दिग्गज खेळाडूंनी ही बक्षीसे दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाच्या या सर्व दिग्गज खेळाडूंनी प्रत्येकी 50 रुपयांचेच बक्षीस दिल्याचे कार्यक्रमाच्या निवेदकाने जाहीर केलं आहे. 

दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना दिग्गज क्रिकेटपटूंचे बजेट फारच कमी असल्याची मजेशीर टिप्पणी केली आहे तर संपूर्ण भारतीय संघाकडून फक्त 650 रुपयांचेच बक्षीस आले का? असाही गमतीशीर सवाल काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. थोडक्यात शाळेतल्या मुलांनी केलेल्या या क्रिएटीव्ह बक्षीस समारंभाला नेटकरीही भरभरुन दाद देत आहेत. 

Board Exam: खबरदार! बोर्ड परीक्षेत कॉपी कराल तर पहिला दणका शिक्षकांना; CM फडणवीसांचे आदेश