जाहिरात

Trending News: पाणीपुरी खाण्यासाठी महिलेनं तोंड उघडलं आणि उघडंच राहिलं... डॉक्टरांनाही मोठा धक्का! म्हणाले...

Panipuri Incident: एकाच वेळी तोंडात मोठी पाणीपुरी टाकण्याचा प्रयत्न या महिलेला चांगलाच महागात पडला आहे.

Trending News:  पाणीपुरी खाण्यासाठी महिलेनं तोंड उघडलं आणि उघडंच राहिलं... डॉक्टरांनाही मोठा धक्का! म्हणाले...
Panipuri Incident: डॉक्टरांनाही या घटनेनं धक्का बसला.
मुंबई:


Panipuri Incident: एखादा पदार्थ आवडीचा असला की, तो खाताना आपण नकळत काहीतरी वेगळं करून जातो. पण उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेला त्यांच्या आवडत्या पदार्थाने अक्षरशः मोठा धडा शिकवला आहे. एकाच वेळी तोंडात मोठी पाणीपुरी टाकण्याचा प्रयत्न या महिलेला चांगलाच महागात पडला आहे.

या प्रयत्नात महिलेचा जबडा (Jaw) जागेवरून सरकला (Dislocate ) आणि तिचे तोंड उघडेच राहिले. अत्यंत वेदनादायक आणि दुर्मिळ असलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही चकित करणारी घटना उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातून समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

दिबियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गौरीकिशनपूर ककोर येथील रहिवासी असलेल्या इंककला देवी (वय अंदाजे 50) या त्यांच्या पुतण्या-सूनबाईच्या प्रसूतीसाठी कुटुंबासह औरैया जिल्हा रुग्णालयाजवळ थांबल्या होत्या. सकाळी मुलांनी पाणीपुरी खाण्याचा हट्ट केला. त्यानुसार संपूर्ण कुटुंब एका ठेलागाडीजवळ पोहोचले. इंककला देवी यांनी एक मोठी पाणीपुरी उचलली आणि ती एकाचवेळी तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. तोंडाचे झाकण पूर्ण उघडले, पण ती पाणीपुरी अर्धी आत आणि अर्धी बाहेर असतानाच त्यांचा जबडा जागेवर 'लॉक' झाला. लाख प्रयत्न करूनही तोंड बंद झाले नाही आणि त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या.

( नक्की वाचा : Job Loss Viral Video: नोकरी गेली... घरात आईनं दोन घासही विचारले नाहीत; तरुणाचा 'हा' व्हिडिओ पाहून मन हेलावेल! )
 

इंककला देवी यांच्या नात्यातील सावित्री देवी यांनी सांगितले की, "हे सर्व एका क्षणात घडले. सुरुवातीला आम्हाला वाटले की ती मस्करी करत आहे, पण जेव्हा दीदी वेदनेने रडू लागल्या आणि त्यांचे तोंड बंद झाले नाही, तेव्हा आम्ही त्वरित हॉस्पिटलमध्ये धाव घेतली."

डॉक्टरही चकित

जिल्हा रुग्णालयात ड्युटीवर असलेले डॉ. मनोज कुमार यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "रुग्णाचा जबडा पूर्णपणे डिसलोकेट झाला होता. आम्ही Manual Reduction (हस्तक्षेपाद्वारे जबडा पूर्ववत करण्याची प्रक्रिया) चे अनेक प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही." अखेरीस, रुग्णाची प्रकृती पाहून त्यांना उच्च उपचारांसाठी सैफई मेडिकल युनिव्हर्सिटी येथे रेफर करण्यात आले. डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, अशाप्रकारचे केस त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत, ज्यामुळे ते स्वतःदेखील चकित झाले.

डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

या अनपेक्षित घटनेनंतर डॉक्टर अशा प्रवृत्तीच्या लोकांना सल्ला देत आहेत. ज्या लोकांना जबड्यामध्ये सतत वेदना जाणवतात किंवा ज्यांचे तोंड पूर्ण उघडत नाही, अशा लोकांनी जबरदस्तीने तोंड उघडण्याचा प्रयत्न करू नये. अन्न खाताना किंवा कोणताही मोठा पदार्थ तोंडात टाकताना अतिशय हळूवारपणे आणि काळजीपूर्वक खाणे आवश्यक आहे. मोठ्या आकाराचे खाद्यपदार्थ एकाच वेळी खाण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अचानक वेगाने तोंड उघडल्यास जबडा डिसलोकेट होण्याची शक्यता वाढते, असे डॉक्टरांचे मत आहे.

सध्या इंककला देवी यांचे उपचार सुरू आहेत आणि त्या अजूनही योग्यरित्या तोंड बंद करू शकत नाहीत व त्यांना सतत वेदना होत आहेत. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर पाणीपुरी विक्रेतादेखील घाबरलेला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com