21 Crore Rs Buffalo Death Viral Video Fact Check: राजस्थानमध्ये आयोजित होणारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि देशातील सर्वाधिक गर्दीच्या पशुमेळ्यांपैकी एक असलेल्या 'पुष्कर पशु मेळ्या'तून एक हादरवणारी बातमी समोर आली. या पुष्कर मेळाव्यात तब्बल 21 कोटी किंमत असलेल्या म्हशीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. पैशासाठी मुक्या प्राण्यांच्या जिवाशी खेळतात, अशी टीका अनेकांनी केली आहे. मात्र आता या म्हैशीबाबत नवीच अपडेट समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
राजस्थानमधील पुष्कर पशु मेळा (Rajasthan Pushkar Animal Fair 2025) सर्वत्र प्रसिद्ध आहे. नेहमी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित होणारा हा सप्ताहभर चालणारा मेळा दरवर्षी भारत आणि जगभरातील हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. यंदाही या मेळ्यात अनेक मौल्यवान पशुधन दाखल झाले आहे. याच मेळ्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या २१ कोटी रुपयांच्या म्हशीच्या मृत्यूची बातमी अचानक सोशल मीडियावर पसरली. तब्बल '२१ कोटी रुपये' इतकी विक्रमी किंमत असलेली म्हैस दगावल्याची बातमी समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.
नक्की वाचा: VIDEO: बाप रे बाप! परदेशी ट्रेनमध्ये पाण्याच्या बॉटलची 'एवढी' किंमत, तरुणाला आपला भारत आठवला
अभिनेत्रीचा संताप
अनेकांनी पैशासाठी मुक्या प्राण्यांचा जीव घेतात, असे म्हणत जोरदार टीका केली. अभिनेत्री स्नेहा उल्लालनेही यावरुन टीका केली होती. "अधिक हार्मोन्स, अधिक अँटीबायोटिक्स आणि ग्रोथ हार्मोन्स वापरा. निसर्गाविरुद्ध जा आणि नंतर त्या मृत्यूला नैसर्गिक बनवा. ही घाणेरडी मानवी मानसिकता आहे, असे तिने म्हटले. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही बातमी खोटी असल्याचा दावा आता म्हैशीच्या मालकाने केला आहे.
सत्य मात्र वेगळंच...
विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ कोटी रुपयांची म्हैस पूर्णपणे स्वस्थ आणि सुदृढ आहे. प्रत्यक्षात, मेळ्यात आणलेल्या एका दुसऱ्या म्हशीची प्रकृती बिघडल्याची आणि तिच्यावर उपचार सुरू असताना तिची अवस्था गंभीर झाल्याची बातमी होती. ही बातमी चुकीच्या पद्धतीने 'करोडोंच्या' म्हशीशी जोडली गेली, ज्यामुळे मोठा गैरसमज निर्माण झाला.
नक्की वाचा: Toxic Work Culture: फक्त 4 मिनिटे लवकर लॉगआऊट.. HR ने हद्दच केली! संतापजनक व्हॉट्सअॅप चॅट VIRAL
म्हशीच्या मालकाने प्रसारमाध्यमांशी बोलताना या अफवा फेटाळून लावल्या. "आमच्या म्हशीला कोणतीही समस्या नाही. प्रवासाच्या आणि मेळ्यातील वातावरणामुळे तिला थोडा थकवा आला होता, त्यामुळे तिला आराम देण्यात आला होता. पण आता ती पूर्णपणे बरी आणि निरोगी आहे." त्यांनी नागरिकांना आणि प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे की, कोणतीही बातमी खात्री न करता प्रसारित करू नये आणि अशा अफवांवर लक्ष देऊ नये.