Employee Frustrated From HR VIRAL POST: कल्पना करा, तुमची शिफ्ट 6.30 वाजता संपते आणि तुम्ही 6. 26 वाजता म्हणजे चार मिनिटे लवकर लॉग आउट करता, पण दुसऱ्याच दिवशी एचआर तुम्हाला फटकारते, तर तुम्हाला किती राग येईल? एका महिला कर्मचाऱ्याला एचआरच्या अशाच वागण्याचा अनुभव आला जो तिने तिने रेडिटवर शेअर केला आहे. तरुणीची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय बनली. नेमकं काय घडलं? वाचा..
नेमकं काय घडलं?
कर्मचारीने केलेल्या पोस्टनुसार, त्या दिवशी तिची शिफ्ट सायंकाळी 6:30 वाजता संपत होती, पण तिने 6:26 वाजता लॉग आउट केले. फक्त चार मिनिटे लवकर लॉग आउट केल्याची ही बाब एचआरला खटकली. एचआरने कठोर शब्दांत सांगितले, "नियम म्हणजे नियम असतात. तुम्ही चार मिनिटे लवकर लॉग आउट करू शकत नाही."
कर्मचारीने स्पष्टीकरण दिले की, ती त्या दिवशी लवकर लॉग इन झाली होती. तरीही एचआरने ते मान्य न करता उत्तर दिले, "तुम्ही कधीही लॉग इन झाला असाल, पण लॉग आउटची वेळ निश्चित आहे." या 'मायक्रोमॅनेजमेंट'मुळे कर्मचारी इतकी त्रस्त झाली आहे की, तिने 'नोकरी सोडण्याचा' विचार बोलून दाखवला आहे, मात्र सध्या दुसरा पर्याय नसल्याचेही तिने नमूद केले.

ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना शिक्षा!
धक्कादायक म्हणजे या प्रकारानंतर एचआरने आता एक नवीन 'झंझट' सुरू केला आहे. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दररोज व्हॉट्सॲपवर लॉग इन आणि लॉग आउटची वेळ पाठवण्यास सांगितले आहे. कंपनीकडे आधीच चांगले अटेंडन्स सिस्टीम असताना ही अतिरिक्त पाळत का, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. हाच प्रश्न आता हजारो युजर्स सोशल मीडियावर विचारत आहेत. तरुणीच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने आता तुम्हीही बरोबर 6:30 वाजताच लॉग आउट करा आणि कधीही एक मिनिटही जास्त देऊ नका, असा सल्ला दिला आहे. तर आणखी एकाने अशा एचआर एचआर ऑफिसला तुरुंग बनवतात. नवी नोकरी पाहा आणि आनंदात राहा, असा सल्ला दिला आहे. या संपूर्ण घटनेमुळे कॉर्पोरेट संस्कृतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world