Europe Train Expensive Water Bottle Viral Video: सोशल मीडियावर एका व्यक्तीची पोस्ट सध्या खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात त्याने युरोपमधील एका ट्रेनमध्ये खरेदी केलेल्या पाण्याच्या बाटलीची किंमत शेअर केली आहे. "मी माझ्या आयुष्यातील सर्वात महागडे पाणी पिले, असं तो म्हणाला. युरोपच्या एका हाय-स्पीड ट्रेनमधून प्रवास करताना त्याला पाण्याच्या बाटलीसाठी मोजावी लागलेली किंमत पाहून जोरदार धक्का बसला. हा व्हिडिओ सध्या माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओ?
या व्हायरल व्हिडिओमध्ये @prateek06jain नावाचा यूजर प्रवासादरम्यान ५ युरो म्हणजेच सुमारे ५०० रुपये किमतीची पाण्याची बाटली विकत घेण्याचा आपला मजेशीर अनुभव सांगताना दिसत आहे. त्याला खूप तहान लागली होती, पण बाहेर जाऊन पाणी पिण्यासाठी सुमारे ४ तास लागतील असे त्याला समजले. अखेरीस तो ट्रेनच्या मधल्या डब्यात पोहोचला, जिथे कॅन्टीन होते.
Toxic Work Culture: फक्त 4 मिनिटे लवकर लॉगआऊट.. HR ने हद्दच केली! संतापजनक व्हॉट्सअॅप चॅट VIRAL
तिथे एका साध्या पाण्याच्या बाटलीची किंमत ५ युरो (सुमारे ५०० रुपये) असल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. तो हसून सांगतो की, ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महागडी पाण्याची बाटली आहे. या किमतीमुळे त्याला लगेचच भारताच्या आयआरसीटीसी ट्रेन्सची आठवण झाली, जिथे याच रकमेत अनेक बाटल्या मिळू शकतात. तो मस्करीत म्हणतो, भारतीय रेल्वेची केटरिंग सर्व्हिस किती चांगली आहे, जिथे प्रवासी त्यांच्या सीटवरच स्वस्त आणि चांगले खाद्यपदार्थ व पाणी मागवू शकतात.
हा व्हिडिओ ९२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि युजर्सनी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आता कळले भारतीय ट्रेनमधील२० रुपयांची बाटली किती मौल्यवान आहे. तर आणखी एकाने युरोपला फिरायला जाण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता पाणी पिण्यापूर्वी विचार करावा लागेल, अशी मजेशीर कमेंट केली आहे.
ट्रेनमध्ये वस्तू महाग का?
तज्ज्ञांच्या मते, युरोपमधील हाय-स्पीड किंवा क्रॉस-कंट्री ट्रेन्समध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर सेवा शुल्क (Service Charge) आणि कर (Tax) जोडलेला असतो. तसेच, प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने अनेकदा किंमती वाढवल्या जातात. स्थानिक लोक सहसा ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच स्टेशनवरून पाणी आणि स्नॅक्स खरेदी करतात, जेणेकरून त्यांना ट्रेनमध्ये जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world