Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल

या निर्णयामागील नेमके कारण काय, असा प्रश्न जेव्हा कुटुंबातील सर्वात मोठ्या भावाला विचारला गेला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Unique Marriage: अलीकडेच एका अत्यंत अनपेक्षित आणि वादग्रस्त घटनेमुळे समाजमाध्यमांवर मोठी खळबळ उडाली आहे. महागाई आणि गरिबीच्या नावाखाली, एकाच कुटुंबातील सहा सख्ख्या (real) भावंडांनी म्हणजेच त्यात तीन भाऊ आणि तीन बहिणींनी आपापसांत विवाह केला असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या 'निकाह' सोहळ्यावर सामाजिक तसेच धार्मिक दृष्टिकोनातून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडली आहे. 

जगभरात लग्नाच्या विविध विचित्र प्रथा आणि परंपरा आहेत. काही ठिकाणी चुलत किंवा मावस भावंडांमध्ये विवाह सामान्य मानला जातोय असं असलं तरी, सख्ख्या भावंडांमधील विवाह ही अत्यंत दुर्मिळ आणि अनेक संस्कृतींमध्ये निषिद्ध मानली जाणारी घटना आहे. व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, सहाही भावंडांनी एकाच दिवशी अत्यंत साधेपणाने आणि कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत निकाह केला.

नक्की वाचा - Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे

या निर्णयामागील नेमके कारण काय, असा प्रश्न जेव्हा कुटुंबातील सर्वात मोठ्या भावाला विचारला गेला, तेव्हा त्याचे उत्तर अधिकच आश्चर्यकारक आणि तेवढेच धक्कादायक होते. त्याने सांगितले की, वाढती महागाई आणि कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  तसेच कुटुंबातील एकोपा (unity) कायम ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. आम्ही सर्व भावांनी एकाच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून खर्च कमी होईल आणि आम्ही एकसंध राहू," असे त्याने स्पष्ट केले. 

नक्की वाचा - Pune News: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अडचणीत! 4285 कोटींच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार? काय आहे कारण?

मोठ्या भावाच्या पत्नीनेही हे लग्न 'तिच्या पसंतीचे' असल्याचे सांगितले. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी 'गरिबीमुळे घेतलेला अनोखा निर्णय' म्हणून याकडे पाहिले आहे. तर बहुतांश लोकांनी सामाजिक आणि धार्मिक नियमांनुसार या लग्नाची वैधता आणि नैतिकता यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सामाजिक संरचनेवर एक गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement