
Raj Thackeray and Sonali Bendre : मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने (Marathi Bhasha Gaurav Din 2025) (27 फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि कविता वाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिनेक्षेत्रासह वृत्त माध्यमातील दिग्गजांनी कविता सादर केली. दादरमधील शिवाजी पार्कात हा कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमात स्वत: राज ठाकरे यांनीही कविता सादर केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोनाली बेंद्रे यांनी विंदा करंदीकरांची देणाऱ्याने देत जावे ही कविता सादर केली. याशिवाय विकी कौशल, आशा भोसले, अशोक सराफ, आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, लक्ष्मण उत्तेकर यांनीही कविता सादर केली. दरम्यान या कार्यक्रमानंतर काव्यवाचनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकाच फ्रेममध्ये दिसले. यावेळी तिघेही छान गप्पा मारताना दिसले.
याशिवाय सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली बेंद्रे ही राज ठाकरेंना पुढे येण्यासाठी खुणावत असल्याचं दिसत आहे.

साधारण 90 च्या दशकात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरेंमध्ये चांगली मैत्री असल्याची चर्चा होती. चित्रपटसृष्टीत सोनाली बेंद्रेला राज ठाकरेंकडून त्यावेळी बरीच मदत केल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जातं. 1996 साली जेव्हा मायकल जॅक्सन पहिल्यांदा मुंबईत आला, त्यावेळी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे त्याच्या स्वागतासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे एकत्रित काढलेले फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world