Startup Success Story: 24 वर्षांच्या तरुणाने नोकरी सोडून सुरू केला स्टार्टअप, 4 महिन्यांतच कमावले 1 कोटी रुपये

Startup Success Story: 24 वर्षीय उद्योजक उज्ज्वल नरगोत्राने 4 महिन्यांत 1 कोटी रुपयांचा स्टार्टअप कसा उभा केला? जाणून घ्या 'LinkPlease' च्या यशाची आणि त्याच्या स्ट्रॅटेजीची संपूर्ण माहिती.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Startup Success Story: नोकरी सोडली, 4 महिन्यात उभी केली 1 कोटींची स्टार्टअप कंपनी"
Ujjwal N Instagram

Startup Success Story: आजच्या काळात स्टार्टअप सुरू करणे सोपे मानले जात नाही, पण 24 वर्षांच्या एका तरुणाने अवघ्या 4 महिन्यांत 1 कोटी रुपयांचा स्टार्टअप उभा केल्याचा दावा केला आहे. ही गोष्ट केवळ वेगाने यश मिळवण्याची नाही, तर योग्य समस्या ओळखून त्यावर तातडीने काम करण्याची आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या तरुणाच्या कहाणीने लोकांना आश्चर्यचकित आणि प्रेरितही केले आहे.

कल्पना कशी सुचली?

24 वर्षीय बिझनेसमन उज्ज्वल नरगोत्राने सांगितलं की, ही कल्पना 'क्रिएटर इकॉनॉमी'मधील एक मोठी समस्या पाहून सुचली. कंटेंट क्रीएटर्स उत्तम व्हिडीओ आणि पोस्ट तर बनवत आहेत, पण त्यांना येणारे हजारो DM आणि कमेंट्स हाताळणं कठीण जात आहे. या समस्येवर त्यानं काम करण्याचं ठरवलं. जर ही प्रक्रिया Automate केली, तर क्रीएटर्ससाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, असं त्याला वाटलं.  

Advertisement

पाहा Video:

4 महिन्यांत 1 कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास

उज्ज्वलने जास्त विचार करण्यापेक्षा वेगानं काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानं आपली नोकरी सोडली आणि एक बेसिक प्रोडक्ट (Basic Product) तयार केलं. त्याचं हे प्रोडक्ट परफेक्ट नव्हते, पण युजर्संना वापरण्यायोग्य नक्कीच होतं. त्यानं तयार केलेलं 'LinkPlease' प्लॅटफॉर्म क्रीएटर्सच्या ऑडियन्स एंगेजमेंटला ऑटोमेट करण्यास मदत करते, ज्यामुळे न वाचलेले मेसेज आणि संधी शोधणे सोपे होते. हळूहळू या प्लॅटफॉर्मशी 10,000 हून अधिक क्रीएटर्स जोडले गेले आणि युजर्सच्या फीडबॅकनुसार प्रोडक्टमध्ये सुधारणा करण्यात आली. उज्ज्वलने दावा केलाय की, त्याच्या कंपनीनं कोणत्याही बाहेरील फंडिंगशिवाय 1 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

(नक्की वाचा: New Salary Structure: 50000 पगार असेल तर इनहँड किती रक्कम येईल? PF-HRA-Gratuityपासून ते रिटायरमेंट फंडपर्यंतचे गणित जाणून घ्या)
 
पुढील टार्गेट काय?

आता उज्ज्वलचे पुढचे टार्गेट स्टार्टअपचे उत्पन्न 1 कोटी रुपयावंरून 10 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आहे. जर योग्य समस्या लवकर सोडवली, तर प्रगती आपोआप होते, असं त्याचं मत आहे. 

लोकांचे प्रश्न

एकीकडे लोक उज्ज्वलच्या यशाचे कौतुक करत असताना, दुसरीकडे काही लोक प्रश्नही उपस्थित करत आहेत. अनेक युजर्सनी विचारले की, 1 कोटी रुपयांचा हा आकडा नेमका काय आहे? हे महसूल (Revenue) आहे की एकूण व्हॅल्यूएशन (Valuation)? काहींनी 'ManyChat' आणि 'SuperBio' सारख्या प्लॅटफॉर्मशी तुलना करत यात नवीन काय आहे, असा प्रश्न विचारला.  

Advertisement