New Labour Laws: देशात नवीन लेबर कोड (New Labour Laws) लागू झाल्यानंतर तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये (Salary Structure) मोठा बदल होणार आहे. नवीन नियमांनुसार आता तुमचे 'बेसिक पे' (Basic Pay), 'महागाई भत्ता' (DA) आणि 'रिटेंशन अलाउंस' मिळून तुमच्या एकूण वार्षिक पगाराच्या (CTC) किमान 50 टक्के असणे अनिवार्य आहे. जर तुमचे इतर भत्ते (उदाहरणार्थ बोनस, HRA, स्पेशल अलाउंस) एकूण पगाराच्या 50 टक्के पेक्षा जास्त असतील, तर तो अतिरिक्त हिस्सा बेसिक सॅलरीमध्ये जोडला जाईल. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार आहे. जर तुमचे वार्षिक पॅकेज 6 लाख रुपये (दरमहा 50,000 रुपये) असेल तर त्याचा तुमच्या पगार आणि पेन्शन फंडवर काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.
हातात येणारा पगार का कमी होईल?
जरी तुमची एकूण ग्रॉस सॅलरी (Gross Salary) बदललेली नसली तरी बेसिक पे वाढल्यामुळे तुमच्या 'इन-हँड' पगारात (Take-home Pay) काहीशी घट होऊ शकते. याचे कारण असे की, ईपीएफ (EPF) आणि ईएसआयसी (ESIC) यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचे योगदान तुमच्या बेसिक पगारानुसार ठरते. बेसिक पगार वाढल्यामुळे या फंडमधील तुमचे योगदानही वाढेल, परिणामी दरमहा बँक खात्यात येणारा पगार थोडा कमी होईल.
6 लाख रुपयांच्या पॅकेजवर पगाराचे गणित
समजा तुमचे वार्षिक सीटीसी 6 लाख रुपये आहे तर नवीन नियमांनंतरचे बदल खालीलप्रमाणे असतील:
- बेसिक पे: पूर्वी 20,000 रुपये होता, तो आता 25,000 रुपये झाला आहे.
- HRA आणि स्पेशल अलाउंस: HRA 10,000 वरून 12,500 रुपये झाला, पण स्पेशल अलाउंस 17,600 वरून घट होऊन 10,100 रुपये करण्यात आला आहे. एकूण ग्रॉस सॅलरी 47,600 रुपयांवर स्थिर आहे.
- पीएफ योगदान (EPF Contribution): कर्मचाऱ्याचा पीएफ हिस्सा 2,400 रुपयांवरून 3,000 रुपये झाला आहे.
- टेक-होम सॅलरी: या बदलांनंतर हातात येणारा निव्वळ पगार 45,000 रुपयांवरून 44,400 रुपये झाला आहे. म्हणजेच दरमहा 600 रुपये कमी मिळतील.
(नक्की वाचा: Rajasthan News: आधार कार्डवरील त्या चुकीमुळे तरुणी डिप्रेशनमध्ये, कॉलेजने प्रवेश नाकारल्याने थेट सुसाइडचं पाऊल; जबाबदार कोण?)
रिटायरमेंट फंड आणि ग्रॅच्युइटीमध्ये होणार मोठी वाढ
- जरी दरमहा मिळणारी रक्कम थोडी कमी झाली असली, तरी तुमच्या दीर्घकालीन बचतीला मोठा फायदा मिळेल.
- पीएफमध्ये जास्त योगदान दिल्याने निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा होईल. याशिवाय तुमच्या ग्रॅच्युइटीच्या रकमेतही वाढ होईल.
- 6 लाख रुपयांच्या उदाहरणात एका वर्षाची ग्रॅच्युइटी सुमारे 14 हजार 423 रुपये इतकी असेल जी 5 वर्षांच्या सेवेनंतर 72 हजार 115 रुपयांपर्यंत पोहोचेल.
(नक्की वाचा: Business Idea: घरातल्या अंधाऱ्या खोलीत करा पांढऱ्या सोन्याची शेती, दर महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत येईल कमाई)
थोडक्यात सांगायचे झाले तर नवीन लेबर कोडचा उद्देश कर्मचाऱ्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे हा आहे. आज मिळणारा थोडा कमी पगार भविष्यात पेन्शन आणि पीएफच्या स्वरूपात मोठ्या सुरक्षिततेची खात्री देईल.

Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world