Trending News: बापरे! पाणी समजून तिने ACID पिलं, एक घोट घेताच भयंकर अवस्था; VIDEO पाहून थरकाप उडेल

कर्मचाऱ्याने आपली बाटली त्या तरुणीला दिली. तीव्र तहान लागल्याने, रियाने विचार न करता ते पाणी समजून बाटली उघडली आणि प्यायली. पुढच्याच क्षणी ती किंचाळली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Girl Drunk Accid Viral VIDEO:  हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दागिने खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणीने तहान लागल्याने दुकानदाराकडे पाणी मागितले.  पण त्याऐवजी तिला ॲसिडने भरलेली एक बाटली आढळली. पाणी समजून तिने थेट ती तोंडाला लावली एक घोट घेताच ती किंचाळली अन् तिची प्रकृती बिघडली. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाण्याऐवजी ॲसिड पिली, तरुणीची झाली भयंकर अवस्था 

समोर आलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी संध्याकाळी रिया नावाची एक तरुणी अर्जुन नगर, कोतवाली भागातील एका दागिन्यांच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी गेली होती. तहान लागल्याने, सराफाने आपल्या कर्मचाऱ्याला जवळच्या मिठाईच्या दुकानातून एक ब्रँडेड बाटली आणायला सांगितले. दुकानदाराने डीप फ्रीझरमधून बाटली काढून कर्मचाऱ्याला दिली. कर्मचाऱ्याने आपली बाटली त्या तरुणीला दिली. तीव्र तहान लागल्याने, रियाने विचार न करता ते पाणी समजून बाटली उघडली आणि प्यायली. पुढच्याच क्षणी ती किंचाळली.

Advertisement

World News : जगात सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश, हजार लोकही राहत नाहीत, यामागचं कारणंही थक्क करणारं

ती बाटली पाण्याऐवजी ॲसिडने भरलेली होती. ती तरुणी तात्काळ दुकानातून बाहेर पळाली आणि तोंडात गेलेला द्रव थुंकून टाकला. तिची प्रकृती खालावल्याने, प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर गंभीर अवस्थेत एका मोठ्या केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी मिठाईच्या दुकानदाराला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली.

पाण्याच्या बॉटलमध्ये ॲसिड कसे आले? 

दुकानदाराचा दावा आहे की बाटली सीलबंद होती आणि ती फ्रिजमधून काढण्यात आली होती. आम्ही ती जशी फ्रिजमध्ये ठेवली होती, त्याच स्थितीत ग्राहकाला दिली." पोलिसांनी दुकानातून ॲसिडने भरलेल्या अनेक बाटल्याही जप्त केल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले आहे. सराफाच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना चित्रित झाली आहे. आता मुख्य प्रश्न हा आहे की ॲसिड पाण्याच्या बाटलीत कसे आले आणि यासाठी जबाबदार कोण आहे. पोलीस सध्या सर्व बाबींचा तपास करत आहेत. वैद्यकीय अहवाल आणि न्यायवैद्यक तपासणीनंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होईल.

नक्की वाचा >> मित्र-मैत्रिणींचा बर्थडे कधी आहे? आता WhatsApp वरही मिळणार रिमाएंडर, कसं ते जाणून घ्या


Topics mentioned in this article