Optical illusion IQ Test : रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या मेंदूवर ताण येतो. ऑफिसचं काम असो किंवा वैयक्तिक जीवन..लोकांच्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार घोंगावत असतात. पण या लोकांच्या सुस्तावलेल्या मेंदूला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे कठीण फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहिल्यावर लोकांचा मेंदू सक्रीय तर होतोच, पण त्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे की नाही, याचाही अंदाज त्यांना येतो. ऑप्टिकल इल्यूजनचा असाच एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
या फोटोत समुद्र आहे, असं खूप लोकांना वाटतंय. पण या फोटोला तीक्ष्ण नजरेत पाहिलं, तर हा फोटो समुद्राचा नसून यात वेगळंच काहीतरी दडलंय, हे तुम्हाला पाहता येईल. हा फोटो समुद्राचा नाही, मग या फोटोत आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. या फोटोतील गुपित शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंदांचा वेळ असणार आहे.
नक्की वाचा >> सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी असेल, त्यांनाचा या फोटोत काय लपलं आहे, याचा शोध घेता येईल. @Rainmaker1973 नावाच्या एका यूजरने हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत म्हटलंय, हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचं एक जबरदस्त उदाहरण आहे. या फोटोमुळे तुमचा मेंदू आणि डोकं चक्रावूनच जाईल.फोटोकडे पहिल्यांदा पाहिलं तर तुम्हाला या फोटोत समुद्रकिनारा असल्यासारखं दिसेल. तसच या फोटोत समुद्री आकाश,खडक आणि तारेही दिसतील, पण नंतर...
इथे पाहा ऑप्टिकल इल्यूजनचा व्हायरल फोटो
ज्या लोकांना या फोटोत समुद्र दिसला आहे. त्यांना बुद्धीचा कस लावण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल, त्यांनाच या फोटोत समुद्र नाही तर एका कारचा खालचा भाग आहे. तसच तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला या फोटोत कारचा दरवाजाही दिसेल. या फोटोबाबत अनेकांना वेगवेगळे चित्र दिसले असतील. पण ज्यांना या फोटोत कारचा भाग दिसला नसेल, तर त्यांना फक्त समुद्रच दिसला असेल. तर त्यांना या फोटोला आणखी बारकाईने पाहण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून फोटोत काय आहे, हे त्यांना कळू शकेल.