Viral News: कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अनेकदा अपमान, टोमण्यांचा सामना करावा लागतो. बॉसकडून वारंवार होणाऱ्या अपमानामुळे अनेकजण जॉबही सोडून देतात. आयर्लंडमधील एका कंपनीमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्याला वारंवार बटाटा म्हणत चिडवल्याप्रकरणी कोर्टाने कंपनीला मोठा दणका दिला असून तब्बल २९ लाखांचा दंड ठोठावला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या...
महिलेला चिडवणं पडलं महागात
ऑफिसमध्ये कर्मचाऱ्याला अपशब्द वापरणे आयर्लंडमधील एका कंपनीला महागात पडले आहे. या कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याला तिच्या बॉसने वारंवार वंशवादी टिप्पणी केल्यामुळे न्यायालयाने सुमारे २.९ दशलक्ष रुपये (£२३,५२६) भरपाई म्हणून दिले आहेत. हे प्रकरण युनायटेड किंग्डममधील लीड्स शहरातील आहे, जिथे एका सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीत काम करणाऱ्या महिलेने तिच्या बॉसविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
Buldhana Crime: विवाहितेचा मोबाईल हॅक, सुरु झाला भयंकर छळ! बुलढाण्यातील महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बर्नाडेट हेस ही महिला एका सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीत बुककीपर म्हणून काम करत होती. तिने आरोप केला की तिचा बॉस, मिक अॅटकिन्स अनेकदा तिच्या आयर्लंड ओळखीबद्दल तिची थट्टा करत असे. जेव्हा जेव्हा मतभेद व्हायचे तिचा बॉस तिला "बटाटा" असे म्हणत मोठ्याने थट्टा करायचा. तसेच बॉस तिच्यासमोर "पॅडी" आणि "स्टुपिड पॅडी" सारखे शब्द देखील वापरत होता. याप्रकरणी महिलेने न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली.
प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर, रोजगार न्यायाधिकरणाने असा निष्कर्ष काढला की हे वर्तन वांशिक छळ आहे. न्यायाधीश बकले यांनी त्यांच्या निकालात म्हटले आहे की अशा शब्दांचा सतत वापर आयर्लंड वंशाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी आक्षेपार्ह आणि दुखावणारा असू शकतो या शब्दांमुळे कामाच्या ठिकाणी महिलेसाठी अपमानजनक, भीतीदायक आणि अस्वस्थ वातावरण तयार झाले होते.
कंपनीला दणका, 29 लाखांचा दंड
महिलेने न्यायालयाला सांगितले की सहा महिने हा प्रकार सुरु होता. या काळात ऑफिसला जाताना तिला दररोज खूप ताण येत असे. मला असे वाटले की जणू काही मला एकाच वेळी हजारो लहान जखमा होत आहेत. ऑफिसमध्ये जाताना मला शारीरिकदृष्ट्याही वाईट वाटले. या वर्तनामुळे तिचा आत्मविश्वास गेला,असंही ती म्हणाली.
Rohit Pawar: अजित पवार विमान अपघात! 'ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवार यांचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले...
दरम्यान, महिलेने असेही स्पष्ट केले की तिला पैशांची गरज असल्याने ती लगेच नोकरी सोडू शकत नव्हती. म्हणूनच ती बराच काळ गप्प राहिली. तथापि, तिने नंतर कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले. सुनावणीनंतर, न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला आणि तिला अंदाजे २९ लाख रुपये भरपाई मिळण्याचे आदेश दिले.