जाहिरात

Rohit Pawar: अजित पवार विमान अपघात! 'ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवार यांचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले...

याचप्रकरणी रोहित पवार यांनी नवा आरोप केला असून ब्लॅकबॉक्समधील डेटा एडिट केले जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Rohit Pawar: अजित पवार विमान अपघात! 'ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवार यांचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले...

Rohit Pawar Tweet on Ajit Pawar Plane Crash Death:  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांनी रान उठवले आहे. अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात? याबाबत सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी ते करत आहेत. तसेच या संपूर्ण अपघात प्रकरणात व्हिएसआर कंपनीला पाठीशी घातले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या अपघाताचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या ब्लॅकबॉक्समधील माहितीशी छेडछाड केली जाऊ शकते, अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती. याचबाबत आता रोहित पवार यांनी सर्वात मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. 

काय आहे रोहित पवार यांचे ट्वीट? 

"फेरफार करण्यात अत्यंत सराईत असलेला VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून FDR (balckbox चा एक भाग ज्यामध्ये विमानांची सर्व तांत्रिक माहिती रेकॉर्ड झालेली असते) मधील एडिट करत असल्याची माहिती मिळाली आहे," असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच  "DGCA किंवा AAIB मधील जे कुणी याकामी मदत करत असतील किंवा करणार असतील त्यांनी forensic audit मध्ये हा फेरफार पकडला जाईल, याची नोंद असू द्यावी. उद्या आम्ही संसदेच्या माध्यमातून समिती स्थापन केल्यानंतर (जी होणारच आहे) आणि त्यात forensic audit झाले जे होणारच आहे तेंव्हा VSR कंपनीला वाचवायला कुणीही येणार नाही. तसंच DGCA मध्ये अनेक अधिकारी प्रामाणिक देखील आहेत हेही लक्षात असू द्यावं,"  असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Shocking News: क्रुर घटनेने महाराष्ट्र हादरला! घरामध्ये लिंगनिदान, सासरच्यांनी विवाहितेला दिल्या नरकयातना

दरम्यान, रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, हा मुद्दा संसदेत उपस्थित करावा, यासाठी ते विविध नेत्यांची भेट घेत आहेत. आत्तापर्यंत रोहित पवार यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांची भेट घेतली. तसेच सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com