BJP Leader Video: भाजप नेत्याला स्मशानभूमीत एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये हा सर्व प्रकार घडला. ही घटना शिकारपूर कोतवाली क्षेत्रातील कैलावन गावाच्या स्मशानभूमीतील आहे. भाजप नेता राहुल वाल्मीकी एका विवाहित महिलेसोबत गाडीत आक्षेपार्ह स्थितीत असताना, त्यांची कार स्मशानभूमीत उभी होती. त्याचवेळी काही लोकांनी तिथे पोहोचून त्यांना रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांना स्मशानभूमीत एक अनोळखी कार उभी दिसली, त्यामुळे त्यांना संशय आला. स्थानिक लोक कारजवळ पोहोचताच त्यांना राहुल वाल्मीकी अर्धनग्न अवस्थेत दिसले. त्यामुळे लोकांना संशय आला आणि त्यांनी राहुलला कारचे दरवाजे उघडायला सांगितले.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यात पकडले गेल्यावर राहुल वाल्मीकी लोकांचे पाय धरून माफी मागताना दिसत आहेत, तर त्यांच्यासोबत असलेली महिला तिच्या ओढणीने स्वत:चा चेहरा लपवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राहुल वाल्मीकी फरार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपने राहुल वाल्मीकीला अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतरही शिकारपूर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
नुकतेच मध्य प्रदेशातील भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनोहरलाल आणि त्यांच्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली त्यांची कार देखील जप्त करण्यात आली होती.