दिल्लीची 'वडा पाव' गर्ल चंद्रिक दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चंद्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. दिल्लीच्या मंगोलपुरी भागात तीचा एक फूट स्टॉल आहे जिथे ती मुंबईचा वडा पाव विकते. जो संपूर्ण दिल्लीत प्रसिद्ध आहे. चंद्रिकाचे ग्राहकांसोबतचा संवाद, भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यावेळी चंद्रिकाने सर्वांनाच धक्का दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रिका फोर्ड मस्टँग कारमध्ये दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रिका अलिशान कार चालवताचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार, एका ग्रे कलरच्या मस्टँग कारमधून उतरताना चंद्रिका दिसत आहे. वडापाव गर्लने मस्टँग कारमधून वडापाव विकण्यास सुरुवात केली, असं कॅप्शन चंद्रिकाने आपल्या व्हिडीओला दिलं आहे.
(नक्की वाचा - अतिशय युनिक, अतिशय वेगळा आमरस डोसा; VIDEO वर नेटिझन्सच्या 'तिखट' कमेंट्स )
चंद्रिका नेहमीच आयुष्यातील सुखाचे क्षण तिच्या फॉलोअर्स सोबत शेअर करते. एखादी नवीन वस्तू घेतली की त्याची माहिती ती सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वीच चंद्रिकाने आयफोन, अॅपल वॉच आणि एअरपॉड्स खरेदी केले होते. या सर्व वस्तूंसोबत तिने पोझ देखील दिली होती.
(नक्की वाचा- वडिलांच्या मृत्यूनंतर लहान वयात कुटुंबाची जबाबदारी, Viral Video पाहून आनंद महिंद्रा यांची मोठी घोषणा)
चंद्रिका ज्या मस्टँग कारमधून उतरताना दिसत आहेत, ती लक्झरी कारपैकी एक आहे. या कारची किंमत जवळपास 75 लाखांपासून सुरु आहे. मात्र चंद्रिका ज्या कारमधून उतरली आहे, ती कार कुणाची आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही.