Video : मुलावर तलवारीनं हल्ला झाला तर हल्लेखोरांना भिडली आई, पाहा कसं पळवून लावलं

कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका महिलेच्या मुलावर दिवसाढवळ्या तलवारीनं हल्ला (Sword Attack)  करण्यात आला. त्यावेळी त्या महिलेनं मोठ्या धैर्यानं त्याला उत्तर देत हल्लेखोरांना पळवून लावलं आणि मुलाचा जीव वाचवला.

Advertisement
Read Time: 2 mins
K
कोल्हापूर:

कोणतीही आईसाठी तिच्या मुलांपेक्षा महत्त्वाचं कुणीही नसतं. मुल संकटात असेल तर आई मोठ्या हिमतीनं ते संकट दूर करण्यासाठी सज्ज होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरच्या एका आईच्या देखील शौर्याचं एक उदाहरण सर्वांसमोर ठेवलंय. तिच्या मुलावर दिवसाढवळ्या तलवारीनं हल्ला (Sword Attack)  करण्यात आला. त्यावेळी त्या महिलेनं मोठ्या धैर्यानं त्याला उत्तर देत हल्लेखोरांना पळवून लावलं आणि मुलाचा जीव वाचवला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रविवारी दुपारी घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला त्याच्या स्कूटीवर बसला आहे. तो त्याच्या आईशी बोलत होता. त्याचवेळी तीन जण एका स्कुटीवर आले आणि त्यानं त्या व्यक्तीवर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात स्कूटीवर बसलेला व्यक्ती थोडक्यात वाचला. 

( नक्की वाचा : सापामुळे अमेरिकेतील शहराची बत्ती गुल, हजारो घरांमध्ये पसरला अंधार! )
 

तलवारीचा सामना करण्यासाठी उचलला दगड

सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झालेल्या या घटनेत त्या व्यक्तीच्या आईनं तातडीनं हल्लेखोरांना उत्तर दिलं. तिनं हल्लेखोरांना मारण्यासाठी दगड उचलला. त्यावेळी हल्लेखोर तिथून पळून गेले. थोड्याच वेळात त्या महिलेचा मुलगा देखील हल्लेखोरांना मारण्यासाठी त्यांच्या मागे पळतो.

Advertisement

3 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिसांनी तीन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचं हल्लेखोरांशी भांडण झालं होतं. त्या भांडणातूनच हा हल्ला झाला. हा हल्ला झाला तेव्हा त्या व्यक्तीचे वडील बाहेरगावी होते. 

Topics mentioned in this article