Blinkit डिलिव्हरी बॉयची श्रीमंती! डिलिव्हरीसाठी अलिशान कारमधून पोहोचला, नेटकरी हैराण 

इन्स्टाग्राम युजर @divyagroovezz ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, एक डिलिव्हरी एजंट काळ्या रंगाच्या थारमधून खाली उतरताना आणि ग्राहकाला सामान देताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Customer Shocked As Blinkit Delivery Agent Arrives In Thar
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • Delivery agent for Blinkit arrived in a Mahindra Thar instead of a scooter
  • Video of the unusual delivery has over 390,000 views on Instagram
  • Customers expressed surprise on camera at the delivery vehicle choice
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

‘क्विक-कॉमर्स'च्या क्षेत्रात बाईकवरून डिलिव्हरी करणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ब्लिंकिटच्या (Blinkit) एका डिलिव्हरी एजंटने चक्क महिंद्रा थार या आलिशान एसयूव्हीमधून ग्राहकाला ऑर्डर दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावर अनेक विनोद आणि प्रतिक्रिया येत आहेत.

इन्स्टाग्राम युजर @divyagroovezz ने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, एक डिलिव्हरी एजंट काळ्या रंगाच्या थारमधून खाली उतरताना आणि ग्राहकाला सामान देताना दिसत आहे. हा अनपेक्षित प्रकार पाहून ग्राहकही गोंधळून गेले आणि ‘भाई, ये थार में डिलिव्हरी करने आया है!' असं म्हटलं.

पाहा Video :
 

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “ब्लिंकिट, तुम्ही तुमच्या डिलिव्हरी एजंटना एवढा पगार देता का? की महिंद्रा थार आता खूप स्वस्त झाली आहे?” असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

(नक्की वाचा- Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

झोमॅटोच्या मालकीची असलेली ब्लिंकिट कंपनी सामान्यतः बाईक किंवा सायकलवरून डिलिव्हरी करते. जेणेकरून ट्रॅफिकमधून सहज मार्ग काढता येतो. त्यामुळे थारमधून डिलिव्हरी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, “EMI भरायची वेळ झाली असेल." दुसऱ्या एकाने याला “ब्लिंकिट प्रीमियम व्हर्जन” असे नाव दिले आहे.या व्हिडीओला 390,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून, यामुळे ब्लिंकिट आणि महिंद्रा थार दोन्ही चर्चेत आल्या आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article