Viral Couple: जोडप्याची प्रेमकहाणी आली समोर, नवरदेवाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; टीकाकारांची बोलती बंद

ऋषभ राजपूतने स्वतः पुढे येऊन एका भावनिक पोस्टद्वारे या ट्रोल्सला उत्तर दिले आहे. ऋषभ राजपूतने आपल्या मूळ पोस्टमध्ये सांगितले की, लोकांच्या मताला आमच्या आयुष्यात फार महत्त्व नाही. गेली 11 वर्षे शोनालीवर मी प्रामाणिकपणे प्रेम करत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मध्य प्रदेशातील जोडप्याचे लग्नाती लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदारा व्हायरल होत आहे. नवरदेवाला ऑनलाईन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तरुणाला रंगामुळे सोशल मीडियावर अनेकजण मर्यादा ओलांडून बोलत आहेत. लग्नाच्या या शुभप्रसंगाचे व्हिडीओ आणि फोटोवर अशा कमेंटमुळे या जोडप्याला मोठ्या मनस्तापाचा सामाना करावा लागत आहे.

कोण आहे हे जोडपं?

सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे दोघे नेमके कोण आहे? त्यांचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील हे जोडपं असून त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. या जोडप्याने 11 वर्षांच्या डेटिंगनंतर नुकतेच लग्न केले. ऋषभ राजपूत असं नवरदेवाचं नाव आहे, तर शोनाली चौकसे असे नवरीचं नाव आहे.

दिव्या (@Divyadubeyy) नावाच्या एका युजरने गुरुवारी फोटो शेअर केला आणि लिहिले, "लग्नांमागील खरे कारण काय आहे?" हा फोटो व्हायरल झाला, ज्याला तीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.

ऋषभ राजपूतची भावनिक पोस्ट

ऋषभ राजपूतने स्वतः पुढे येऊन एका भावनिक पोस्टद्वारे या ट्रोल्सला उत्तर दिले आहे. ऋषभ राजपूतने आपल्या मूळ पोस्टमध्ये सांगितले की, लोकांच्या मताला आमच्या आयुष्यात फार महत्त्व नाही. गेली 11 वर्षे शोनालीवर मी प्रामाणिकपणे प्रेम करत आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Advertisement

ऋषभने म्हटलं की, "2014 हे वर्ष होते जेव्हा मी या क्षणाची पहिल्यांदा इच्छा व्यक्त केली होती. ही अगदी लहान व्हिडिओ क्लिप, जी तुम्हाला 30 सेकंदांची वाटते, त्यात माझे संपूर्ण आयुष्य सामावले. मी घाबरलेलो नाहीये, माझ्या आतमध्ये साठलेल्या भावनांचा तो पूर आहे, कारण मी या क्षणाची जवळपास 11 वर्षांपासून वाट पाहत होतो."

Advertisement

"माझा पगार चांगला आहे, पण..."

ऋषभने ट्रोल्सला उत्तर देताना आपल्या उत्पन्नाबद्दलही स्पष्टीकरण दिले. त्याने म्हटलं की, "मी सरकारी कर्मचारी नाही, पण मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो. मला चांगला पगार आहे, पण तिने माझ्यावर प्रेम केले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून तिने प्रत्येक परिस्थितीत माझी साथ दिली. त्यामुळे तुमच्या मताला खरोखर काही महत्त्व नाही."

पुढे त्याने लिहिलं की, "मी काळा आहे आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यात वंशभेदाचा सामना केला आहे. पण माझी फक्त एक विनंती आहे की, कुटुंबाबद्दल वाईट बोलू नका, एवढी समज ठेवा. कारण तुमच्यासाठी मी एक साधा काळा माणूस असेल, पण माझ्या पत्नीसाठी मी सर्वोत्तम पती बनू इच्छितो."

Advertisement