Teenager Pregnant With Younger Brother: नवजात बाळ एका घराच्या मागील बाजूस अतिशय नाजूक परिस्थिती आढळल्याने खळबळ उडालीय. बाळाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीस हे प्रकरण केवळ नवजात बाळ रस्त्यावर बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचे वाटत होते. पण पोलीस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आलीय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेवारस अवस्थेत आढळलेल्या या बाळाचा संबंध दुसऱ्यातिसऱ्या कोणत्याही व्यक्तीश नसून ज्या ठिकाणी ते सापडलं होतं त्याच घरातील व्यक्तीशी होता. बाळाची आई 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी तर 14 वर्षांचा तिचाच सख्खा भाऊ बाळाचा बाप आहे. या धक्कादायक माहितीमुळे प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालंय. मलेशियाच्या तेरेंगानु प्रांतातील बसुत जिल्ह्यातील ही घटना आहे.
(नक्की वाचा: Vaishnavi Neel Murder: गळा चिरलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती; 4 तासांत आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर)
पोलीस तपासात हैराण करणारी माहिती उघड (Girl Got Pregnant With Real Brother)
बसुत जिल्ह्यातील पोलीस प्रमुख मोहम्मद सानी मोहम्मद सालेह यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बाळाला जन्म दिल्यानंतर समाजाच्या भीतीने मुलीने घराच्या मागील बाजूस सोडले. नवजात बाळ सापडल्याची माहिती पोलिसांना मिळताच PDRM (Royal Malaysia Police) ने तातडीने तपास सुरू करण्यात आला. सख्ख्या नात्यातील अनैतिक संबंध असल्याची माहिती तपास आणि वैद्यकीय अहवालाद्वारे उघड झालीय. याप्रकरणी पोलिसांनी 14 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलंय आणि प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी त्याला एक आठवड्याची कोठडी सुनावलीय.
(नक्की वाचा: Nagpur News: पुण्यानंतर नागपूरकरांमध्ये भीती! चाकूहल्ल्यात 13 वर्षांचा शाळकरी विद्यार्थी गंभीर, आरोपी अल्पवयीन?)
कठोर शिक्षेची तरतूद
मलेशियन कायद्यांच्या दोन गंभीर कलमांतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पहिले कलम 317अंतर्गत बाळ बेवारस अवस्थेत सोडून देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, यानुसार दोषी आढळल्यास सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. Section 376B (Incest law in Malaysia) या कलमानुसार सख्ख्या नात्यांमध्ये लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा मानले जाते, यानुसार सहा ते 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि कोडे मारण्याचीही शिक्षा मिळू शकते. हे प्रकरण केवळ कायद्याचे उल्लंघन नसून मानवतेविरुद्धही गुन्हा असल्याचे पोलिसांनी म्हटलंय, कारण एका नवजात बाळाची आयुष्य गंभीररित्या धोक्यात आणले गेलंय.