Viral News: 20 वर्षांपूर्वीचे जुने LG एअर कंडिशनर आता अचानक सर्वाधिक मौल्यवान व्हिटेंज वस्तू ठरतेय. याचे कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ, ज्यामध्ये जुन्या LG Whisen ACचा लोगो 24 कॅरेट शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. यानंतर आता लोक आपापल्या घरातील जुन्या ACमध्ये खजिन्याचा शोध घेतायेत. व्हायरल झालेला व्हिडीओ दक्षिण कोरियातील आहे.
व्हायरल व्हिडीओमुळे सीक्रेट उघड | Viral Video
दक्षिण कोरियातील सियोल शहरामधील सोन्याच्या दुकानाचे मालक आणि यूट्युबर Ringring Unnie ने एसीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. एअर कंडिशनरमध्ये सोने असते का? अशा हेडिंगसह त्यांनी व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडीओमध्ये एक ग्राहक त्यांच्याकडे धातूचे काही तुकडे घेऊन येतो, जे पाहून दुकानदार आश्चर्यचकित झाल्याचे दिसतंय. हे तुकडे एअर कंडिशनरच्या पुढील बाजूस असणाऱ्या लोगोमधून काढल्याचे ग्राहकाने दुकानदारास सांगितलं. लोगो सोन्याच्या धातूचा आहे आणि जाहिरातीमध्येही याचा उल्लेख केला होता, असे डिलिव्हरी स्टाफने सांगितल्याचंही व्हिडीओद्वारे कळतंय.
(नक्की वाचा: Viral News: 14 वर्षाच्या सख्ख्या भावापासून प्रेग्नेंट राहिली 16 वर्षाची बहीण, बाळ जन्मताच जे केलं ते अतिशय भयंकर)
लोगो वितळवला आणि 24 कॅरेट शुद्ध सोने मिळाले
व्हिडीओमध्ये जेव्हा दुकानदार सहा अक्षरं वितळवतो तेव्हा त्यातून जे नगेट तयार होते, ते 24 कॅरेट शुद्ध सोन्यातून निघते. चाचणी केल्यानंतर दुकानदार ग्राहकाला फोन करू सांगते की एसी लोगोचे सोने 18 कॅरेटचं नसून ते पूर्णपणे शुद्ध सोनं आहे. या सोन्याचे ग्राहकाला 7,13,000 वॉन म्हणजे भारतीय चलनानुसार 44 हजार 344 रुपये मिळाले.
(नक्की वाचा: Viral Video: धक्कादायक! ग्राहकाला दह्यासोबत वाढला मेलेला उंदीर, प्रसिद्ध ढाब्याविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई)
पाहा Video:
...पुन्हा मिळालं सोनं
व्हायरल व्हिडीओ पाहून आणखी एका ग्राहक आपल्या घरातील LG Whisen कंपनीचा लोगो घेऊन सोन्याच्या दुकानात पोहोचला. सुरुवातीस गोल्ड एक्सचेंजनं कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय लोगोचा धातू सोने म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितलं. पण चाचणीमध्ये धातू शुद्ध सोने असल्याचे आढळलं आणि याची किंमत अंदाजे 7,48,000 वॉन म्हणजे भारतीय चलनानुसार 46,520 इतकी मिळाली. दरम्यान Chosun Daily ने दिलेल्या रिपोर्टनुसार, कंपनीकडून सोने केवळ काही ठराविक LG मॉडेलसाठी वापर करण्यात आले होते. वर्ष 2005मध्ये LGने (तेव्हाची Lucky-Goldstar कंपनी) एअर कंडिशनर विक्रीमध्ये सलग पाच वर्षे नंबर 1 राहिल्याच्या रेकॉर्डमुळे 10 हजार लिमिटेड एडिशन AC तयार केले होते, ज्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा लोगो वापरण्यात आला होता. यानंतर 2008मध्ये कंपनीने काही मॉडेल्समध्ये 1 डॉन इतक्या प्रमाणात शुद्ध सोन्याची नेमप्लेट लावली होती, ज्यावर आर्टिस्टची स्वाक्षरीही होती.
NOTE : NDTV मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world