जाहिरात

Viral News: स्वर्गही पाहिला, नरकातील भयंकर किंकाळ्याही ऐकल्या...11 मिनिटांसाठी मेली आणि पाहून आली दुसरं जग

Viral News:मृत्यू झाल्यानंतरही शरीरामध्ये जीव राहतो का? एका अमेरिकन महिलेनं दावा केलाय की,तिच्या हृदयाची धडधड बंद झाल्यानंतर आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर तिने 11 मिनिटांसाठी दुसऱ्या जगाचा अनुभव घेतला आणि हे क्षण ती आजवर विसरू शकलेले नाही.

Viral News: स्वर्गही पाहिला, नरकातील भयंकर किंकाळ्याही ऐकल्या...11 मिनिटांसाठी मेली आणि पाहून आली दुसरं जग
"Viral News: मृत्यूनंतर काय होतं? 11 मिनिटे क्लीनिकली सांगितलं अंगावर काटा आणणारं सत्य"
Canva

Woman Clinically Dead 11 Minutes: हाय ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे एका 68 वर्षांच्या महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तेथे पोहोचताच त्यांची तब्येत खालावली आणि शुद्ध हरपली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, संबंधित महिला काही वेळासाठी क्लिनिकली डेड झाल्या होत्या. त्यांच्या हृदयाची धडधड आणि श्वासही थांबला होता. मेडिकल रेकॉर्डनुसार, जवळपास 11 मिनिटांसाठी त्या मृत झाल्या होत्या, यानंतर डॉक्टर वारंवार CPR देऊन त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न करत होते. 

महिलेचा दावा आहे की, जेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड बंद झाली आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलं, त्यावेळेस 11 मिनिटांसाठी त्या स्वर्गात पोहोचल्या होत्या. तेथे त्यांनी देवदूत, त्यांच्या दिवंगत आईवडिलांसह जन्माला न आलेल्या बाळाचीही भेट घेतली. यादरम्यानच त्यांनी नरकाची भयंकर झलकही पाहिली, ते क्षण त्या आजवर विसरू शकलेल्या नाहीत. अमेरिकेतील कॅन्ससमध्ये राहणाऱ्या शार्लेट होम्स यांनी वर्ष 2019मध्ये या घटनेचा अनुभव घेतला होता. 

शरीराबाहेर बाहेर पडण्याचा अनुभव (Near Death Experience)

शुद्ध आल्यानंतर शार्लेट यांनी जे काही सांगितलं ते ऐकून डॉक्टरांपासून सर्वसामान्य देखील हैराण झाले होते. त्यांनी दावा केला की, यादरम्यान त्या आपल्या शरीराबाहेर होत्या. शार्लेट यांनी केलेल्या दाव्यानुसार, "वरील बाजूने मी स्वतःला पाहत होते. नर्स आणि डॉक्टर माझ्या आसपास होते आणि मला जिवंत करण्यासाठी प्रयत्न करत होते. यानंतर एक तेजस्वी प्रकाश, मधुर संगीत आणि फुलांचा सुगंध आला. हा क्षण स्वर्गातला होता."

स्वर्गाचा अनुभव: जेथे भीती नावाची कोणतीही गोष्ट नाही (Heaven And Hell Experience)

महिलेने सांगितले की, स्वर्ग हे एक असे ठिकाण होते की ज्याचे वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. सर्वत्र शांतता, समाधान आणि आनंदीआनंद होता. झाडे, हिरवळ आणि अगदी वातावरणही संगीतावर डोलत असल्याचं दिसतं होतं. शार्लेट यांनी दावा केलाय की, स्वर्गात दिवंगत पालक, बहीणही भेटले, जे खूपच तरुण आणि निरोगी दिसत होते. गरोदरपणात गमावलेल्या बाळाला पाहिल्याचा क्षण त्यांच्यासाठी अतिशय भावुक होता. 

नरकाची झलक, भीती आणि अस्वस्थ करणारे क्षण (What Happens After Death)

या उलट नरकाचा प्रवास सोपा नव्हता. शार्लेट यांनी नरकाचीही भयानक झलक पाहिल्याचा दावा केलाय. शार्लेट यांनी सांगितलं की, "तेथील वातावरण पूर्णपणे विरुद्ध होते... अंधार, किंकाळ्या, दुर्गंध आणि भीतीदायक आवाज. स्वर्गाच्या शांततेनंतर नरकाची झलक क्षणभरही सहन करणं कठीण होते. ती जागा इतकी भयानक होती की तेथे राहण्याचा विचारही अस्वस्थ करत होता".

11 मिनिटे क्लीनिकली डेड महिला (Charlotte Holmes Story)

शार्लेट यांना शरीरात परतण्याचाही अनुभव आला आणि त्यांना अचानक शुद्धही आली. डॉक्टरांसाठी ही घटना चमत्कारापेक्षा कमी नव्हती. जवळपास दोन आठवड्यांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेनंतर शार्लेटने तिचा अनुभव जगासोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला. हा अनुभव जीवन बदलणारा होता, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं. 28 नोव्हेंबर 2023 रोजी शार्लेट यांचे निधन झाले. 

Viral Video: मॅम तिला मारू नका, कारण... वडिलांचे बोलणं ऐकून लेक रडू लागली अन् वर्गातही पसरली शांतता

(नक्की वाचा: Viral Video: मॅम तिला मारू नका, कारण... वडिलांचे बोलणं ऐकून लेक रडू लागली अन् वर्गातही पसरली शांतता)

स्वर्ग आणि नरकाचा अनुभव  

शार्लेट होम्स यांनी केलेल्या दाव्यावर आजही चर्चा केली जाते, काही लोक यास आध्यात्मिक अनुभव मानतात तर काही लोक मेंदूतील जैविक प्रतिक्रिया. पण ही कहाणी महत्त्वाची आहे कारण ती आपल्याला मृत्यू, चेतना आणि मृत्युनंतरच्या जीवनाच्या शक्यतेवर विचार करण्यास भाग पाडते.

शार्लेट होम्स यांची मुलाखत | 11 Minutes in Heaven Video  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com