Viral Teacher Student Marriage News: सोशल मीडिया म्हणजे असा प्लॅटफॉर्म जिथे दररोज नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडी क्षणात ट्रेंडिंगला येऊन त्याच्यावर जोरदार चर्चाही रंगते. माध्यमांवरील फोटो, व्हिडिओ मागच्या कथा चांगल्याच चर्चेत असतात. सध्या अशाच एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एका विवाहित शिक्षकाने त्याच्याच २२ वर्षीय विद्यार्थिनीशी लग्न केले, असा दावा या फोटोबाबत केला जात आहे, ज्यावर नेटकरीही भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा..
42 वर्षीय गुरुजींचे विद्यार्थिनीशी लग्न...
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज नवनवीन व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होतात. अलिकडे असाच एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका शिक्षकाने त्याच्याच शाळेतील २२ वर्षीय विद्यार्थिनीशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. ही पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. 42 वर्षीय गुरुजींनी शाळेतल्याच विद्यार्थिनीशी लग्न केल्याच्या या दाव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.
महाकुंभातील 'ती' Viral Girl करणार मुस्लीम मुलाशी लग्न, घरं आणि कुटुंबही सोडलं! प्रकरण काय?
या व्हायरल फोटोमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि एक लहान मूल स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "हे ४२ वर्षीय मास्टरजी आहेत ज्यांनी त्यांच्याच शाळेतील २२ वर्षीय विद्यार्थ्याशी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नीने याबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही,असाही दावा केला आहे.
❄️ ये हैं 42 साल के मास्टर साहब…
— zamir (@jamir1919) March 9, 2026
जिन्होंने अपने ही स्कूल की करीब 22 साल की छात्रा से दूसरी शादी कर ली है। 💍😳
और सबसे मजेदार बात ये है कि
मास्टर जी की पहली पत्नी को भी इससे कोई खास परेशानी नहीं है! 😅
अब सच बताऊँ तो…
कभी-कभी लगता है हमारा जन्म तो बस लाइन में खड़े रहने और… pic.twitter.com/3gr7KRomGo
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, सत्य मात्र वेगळेच!
हा फोटो समोर आल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. आम्हाला वाटते की आम्ही फक्त रांगेत उभे राहून जनगणना वाढवण्यासाठी जन्मलो आहोत. मास्टरजी खरे जीवन जगत आहेत, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर आणखी काही नेटकऱ्यांनी गुरुजी शाळेत पुस्तकामधील धडे शिकवत होते की प्रेमाचे धडे देत होते, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. तसच काही सिंगल तरुणांनी आमचेच नशीब वाईट अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची सत्यता पडताळण्यात आली अन् त्याचे वेगळेच सत्य समोर आले. जेव्हा ट्विटर (एक्स) च्या एआय टूल, ग्रोकला व्हायरल फोटोबद्दल विचारले तेव्हा त्याने हा फोटो मीम तयार करण्यासाठी एडिट करण्यात आला आहे, असं सांगितले. या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली असून एआय टूल वापरुन चेहऱ्यावरील हावभाव बदलण्यात आल्याचं स्पष्ट झाले, पण काही नेटकऱ्यांना मात्र ही गुरुजींची लवस्टोरी चांगलीच आवडली आहे.
UP News: खड्ड्यामुळे 'मृत' महिला झाली जिवंत! डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केले अन् चमत्कार घडला!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world