Viral: 10 रुपयाच्या चहाने चमकवलं नशीब, 38 हजारांच्या नोकरीला कंटाळून टाकली चहाची टपरी; कमाई ऐकून व्हाल थक्क

Viral Success Story: एका तरुणाने 38 हजारांची कॉर्पोरेट नोकरी सोडून चहाची टपरी सुरू केली. आज तो महिन्याला इतका मोठा नफा कमवत आहे. वाचा त्याची प्रेरणादायी यशोगाथा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Viral Success Story: कॉर्पोरेट नोकरी सोडून तरुणाने सुरू केली चहाची टपरी अन्..."

Man Quits Job For Tea Shop: धावपळीची जीवनशैली आणि नोकरीतील सततच्या त्रासामुळे ठराविक पगाराला कंटाळून अनेकदा लोक काहीतरी नवीन करण्याचा विचार करतात. पण आपली सुरक्षित नोकरी सोडून एखादी मोठी जोखीम पत्करण्याचे धाडस फार कमी लोक करू शकतात. इंटरनेटवर सध्या अशाच एका धाडसाची आणि कष्टाची गोष्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर अंकित पांडे नावाच्या युझरने त्याच्या शेजाऱ्याची अशीच एक थक्क करणारी गोष्ट शेअर केली आहे, ज्याने डेस्क जॉब सोडून रस्त्याच्या कडेला चहाची टपरी सुरू केली. आज त्याची कमाई ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. 

(नक्की वाचा: Trending News: एका रात्रीचे 50,000.. 'हा' जॉब कराल तर मालामाल व्हाल; पण काम असं की काळजाचा थरकाप उडेल)

Advertisement

नोकरी सोडली आणि चहाचा व्यवसाय सुरू केला (Quitting Corporate Job For Tea Stall)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपल्या शेजाऱ्याची ही यशोगाथा शेअर करताना अंकितने लिहिले की, त्याचा शेजारी आधी 'टेलीपरफॉर्मन्स' (Teleperformance) कंपनीत काम करत होता आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या नोकरीतून त्याला महिन्याला 38 हजार रुपये पगार मिळत होता. मर्यादित वाढ आणि वाढत्या खर्चामुळे हैराण होऊन त्याने नोकरी सोडण्याचा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने मे महिन्यात आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्याच्या या एका निर्णयाने आता त्याची कमाई चक्क तिप्पट वाढवली आहे.

चहाच्या टपरीतून छप्परफाड कमाई (Making Lakhs From Tea Business)

अंकितने आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, नोकरी सोडल्यानंतर त्याच्या शेजाऱ्याने जवळपास दोन लाख रुपयांची गुंतवणूक करून एका ऑटो स्टँडजवळ एक उत्तम चहाचे दुकान (Tea Stall) सुरू केले. एवढेच नाही तर त्याने दुकानात चहा तयार करण्यासाठी आणि ग्राहकांना देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांनाही कामावर ठेवले. त्याच्या चहाच्या टपरीवर साधा चहा 10 रुपयांना आणि प्रीमियम चहा 20 रुपयांना मिळतो. अंकितने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शेजाऱ्याच्या दुकानात रोजचे सुमारे 400 कप चहा विकले जातात, ज्यामुळे दररोज सुमारे 6,000 रुपयांची विक्री होते. म्हणजेच महिन्याला सुमारे 1.8 लाख रुपयांची उलाढाल होते. दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च वजा जाता, तो दरमहा तब्बल एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहे.

(नक्की वाचा: Mumbai Local : लोकलच्या दारात लटकल्याने साडी खांबाला...दिवा-मुंब्रा दरम्यानचा थरारक VIDEO VIRAL)

व्यवसायाचा विस्तार आणि लोकांची साथ (Expanding Business And Social Media Reaction)

अंकितने पोस्टमध्ये पुढे सांगितले की, नुकतेच त्याच्या शेजाऱ्याने आपल्या चहाच्या टपरीवर वडापाव, सामोसे आणि जिलबी देखील विकायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्याची कमाई आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर लोक त्याच्या या निर्णयाचे आणि कष्टाचे भरभरून कौतुक करत आहेत. काही लोक याला एक मोठी जोखीम म्हणत असले, तरी अनेक जण त्याच्या या धाडसाचे कौतुक करत कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Advertisement

(Disclaimer: ही माहिती सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टच्या आधारे देण्यात आली आहे. NDTV या पोस्टची पुष्टी करत नाही.)