- आग्रा येथील ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीडीआय मॉलसमोरील रस्त्यावर दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली
- पत्नीने आपल्या पतीला आणि त्याच्या प्रेयसीला हॉटेलबाहेर रंगेहात पकडून प्रेयसीवर थेट हल्ला केला
- वाद हाणामारीत रूपांतरित झाला आणि पत्नीने प्रेयसीचे केस पकडून रस्त्यावर पाडून बेदम चोप दिला होता
Agra Viral Video: कौटुंबिक वादाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हा प्रकार घडला. शहरातील ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीडीआय मॉल आहे. या मॉल एका हॉटेलबाहेर दोन महिलांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी झाली. आपल्या पतीला प्रेससी सोबत हॉटेलबाहेर पाहिल्यावर पत्नीचा संयम सुटला. तिने थेट प्रेयसीवर हल्ला चढवला. या संपूर्ण हायव्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पत्नीने आपल्या पतीला आणि त्याच्या प्रेयसीला हॉटेलबाहेर रंगेहात पकडले. त्यानंतर तिने प्रेयसीला रस्त्यातच अडवून जाब विचारण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. संतापलेल्या पत्नीने प्रेयसीचे केस पकडून तिला रस्त्यावर पाडले. त्यानंतर बेदम चोप दिला. या दोन्ही महिलांमधील वाद इतका विकोपाला गेला होता की, एका महिलेने मारण्यासाठी हातात वीटदेखील उचलली होती. एकीचे तर कपडे देखील फाटलेले व्हिडीओत दिसत आहेत.
दोघींमध्ये वाद सुरू असताना पती मधोमध पडून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, संतप्त पत्नी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. रस्त्यावरील हा गोंधळ पाहून लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. अखेर पतीने कशीबशी दोघींची सुटका केली. ज्यानंतर प्रेयसी दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ज्या वेळी हा सर्व राडा सुरू होता त्यावेळी तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्याचा व्हिडीओ काढला. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक कमेंट ही येत आहेत. ज्यावेळी पत्नीने पतीच्या प्रेयसीला मारण्यासाठी वीट उचलली होती त्यावेळी तिथं असलेल्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण त्याच वेळी पतीने तिला अडवले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पोलीस या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.