उद्योगपतीने लेकाला 18व्या वाढदिवशी दिली 5 कोटींची कार, Video पाहून तुम्हीही म्हणाल - 'गिफ्ट असावं तर असं'

Lamborghini Huracan STO: मनातील इच्छा प्रत्यक्षामध्ये पूर्ण झाली, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? तुमचा आनंद गगनात मावणार नाही ना. असेच काहीसे एका मुलाच्या आयुष्यामध्ये घडले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
लेकाला 18व्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून दिली महागडी कार

Lamborghini Huracan STO: आपल्याला ज्या-ज्या गोष्टी-वस्तू आवडतात, त्या-त्या विकत घेता याव्यात; अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रत्येकजण महागड्या-मौल्यवान वस्तू विकत घेण्याचे स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनतही घेतात. एखादी वस्तू खूप महागडी असेल तर ती विकत घेण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला हवे ते मिळाले तर? प्रचंड आनंद होईल ना. असेच काहीसे एका मुलाच्या जीवनामध्ये घडले आहे. 18व्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी त्याला 5 कोटी रुपयांची कार गिफ्ट म्हणून दिली. 

पाहा Video:

वाढदिवसाला लॅम्बॉर्गिनी कार दिली गिफ्ट
 

UAEतील उद्योगपती विवेक कुमार रुंगटा यांनी आपल्या मुलाला त्याच्या 18व्या वाढदिवसाचे खास गिफ्ट दिले आहे. रुंगटा यांनी आपल्या लेकाला त्याच्या वाढदिवसानिमित्त महागडी लॅम्बॉर्गिनी कार (Lamborghini Huracan STO) भेट म्हणून दिली. विवेक यांचा मुलगा तरुणने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या कारची झलक देखील फॉलोअर्ससह शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत तरुणने म्हटले की, 'माझ्या 18व्या वाढदिवसाला मला ड्रीम कार गिफ्ट केल्याबद्दल बाबा तुमचे खूप आभार! तुमचे प्रेम आणि पाठिंबा माझ्याकरिता सर्वकाही आहे".

महागड्या कारचा व्हिडीओ व्हायरल 
 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तरुण आपल्या वडिलांसोबत लॅम्बॉर्गिनी कारच्या शोरूममध्ये जाताना दिसत आहे. यानंतर शोरूममधील कर्मचारी तरुणला त्याची ड्रीम कार Lamborghini Huracan STOची झलक दाखवत आहेत. कारची झलक पाहिल्यानंतर तरुणने शोरूममध्येच केक कापून आपला वाढदिवसही साजरा केला. सर्वांना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या.  

Advertisement

व्हिडीओवर युजर्सच्या गंमतीशीर प्रतिक्रिया
 

तरुणचा कारसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की,"माझे वडील गिफ्ट हा शब्द देखील ऐकत नाहीत. तर आणखी एकाने तरुण खूप नशीबवान आहे, अशी कमेंट केली आहे. 

आणखी वाचा

SIP मध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?  'या' टिप्सचा होईल मोठा उपयोग

महागाई घसरली, पण तुमचा EMI कमी होणार आहे का?

गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर कुठे? ही छोटी बँक सर्वात पुढे

Topics mentioned in this article