स्टंट करणं महागात पडलं, 300 फूट खोल दरीत कार कोसळली, थरकाप उडवणारा Video Viral

सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

Maharashtra Table Point Car Stunt Accident Video: सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. ही व्हिडीओ सातारा जिल्ह्यातील गुजरवाडी गावाजवळ असलेल्या टेबल पॉइंटवर (Table Point) चा आहे. यात एक तरुण स्टंट करत असताना दिसत आहे. तो हा स्टंट आपल्या कारसह करत आहे. हा स्टंट करताना तो त्याच्या कारसह 300 फूट खोल दरीत कोसळला. घटनेचा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

स्टंटचे वेड ठरले जीवघेणे

हा धोकादायक अपघात कराड तालुक्यातील साहिल अनिल जाधव (Sahil Anil Jadhav) याच्यासोबत घडला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर त्याला तातडीने दरीतून बाहेर काढण्यात आले. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, साहिल आणि त्याचे मित्र एका कारमध्ये बसून टेबल पॉइंटच्या सपाट भागात स्टंट करत होते. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट खोल दरीत कोसळली.

Advertisement

नक्की वाचा - CIDCO News: माझ्या पसंतीचे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर! घरांची किंमत 25 ते 30 टक्कांनी कमी होणार?

300 फूट खाली कोसळली कार

फोटोशूट आणि उलटा धबधबा पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्यातील टेबल पॉइंट आता पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. पण हे पर्यटन स्थळ जितके सुंदर आहे तितकेच ते धोकादायकही आहे. इथे ना कोणती सुरक्षा रेलिंग आहे ना प्रशासनाकडून कोणताही सूचना फलक (warning board) लावलेला आहे. यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या एका युझरने लिहिले, "जोपर्यंत प्रशासन जागे होईल, तोपर्यंत किती जीव जातील?" तर दुसऱ्याने म्हटले, "स्टंटचा शौक जीवघेणा ठरू शकतो, ही घटना एक सर्वांसाठी धडा आहे."

Advertisement

जीवघेणा स्टंट कशासाठी?

हा अपघात केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित नाही, तर प्रशासकीय निष्काळजीपणा आणि तरुणांच्या बेफिकीर विचारसरणीचे जिवंत उदाहरण मानले पाहीजे. जेव्हा सोशल मीडियावर काही क्षणांच्या लोकप्रियतेसाठी स्टंट केले जातात. पण हेच स्टंट जीवघेणे ठरू शकतात याचे भान स्टंटबाजाना नसते. पर्यटन स्थळांवर (tourist spots) कडक नजर ठेवणे आणि सुरक्षा व्यवस्था (safety arrangements) करणे आवश्यक आहे. अन्यथा, ही सुंदर पर्यटन स्थळं मृत्यूचा सापळा बनतील हे कुणाच्या लक्षातही येणार नाही.

Advertisement