
माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर करण्यात आली. सिडकोनी ही योजना राबवली. मात्र या घरांच्या किंमती सर्वाच शेवटी सांगितल्या. त्यामुळे गोरगरीबांसाठी असणाऱ्या या घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या होत्या. खाजगी बिल्डरांच्या किंमती ऐवढ्या या किंमती होत्या. त्यामुळे हे घर घेणं अनेकांच्या आवाक्या बाहेर होतं. अशा स्थितीत लॉटरीमध्ये घर मिळून ही अनेकांनी ही घरं वाढत्या किंमती मुळे सरेंडर केली आहे. या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ही घरं पडून आहेत. या घरांच्या किंमतीचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. आमदार विक्रांत पाटील, शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा लक्षवेधी द्वारे मांडला. शिवाय या घरांच्या किंमती 50 टक्कांनी कमी कराव्यात अशी मागणी केली. त्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
आमदार विक्रांत पाटीला आणि शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. घरांच्या किंमती बाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. ज्यावेळी किंमती जास्त असतात त्यावेळी म्हाडाने दर कमी केले आहे. सिडको बाबतीत ही सरकार त्या दृष्टीने विचार करेल. गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची बैठक घेतली जाईल. अधिवेश काळात ही बैठक व्हावी असा आपला प्रयत्न असेल. या बैठकीत सिडको घरांच्या दरा बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या घरांच्या किंमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
सिडकोच्या घरांच्या किंमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करता येतील का याचा विचार सरकार करत असल्याचं यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितलं. सरकार याबाबत सकारात्मक असल्याचं ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल असं ही ते म्हणाले. त्यातून सिडको लॉटरीधारकांना मोठा दिलासा मिळेल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. EWS साठी असलेल्या घरांच्या किंमती या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या होत्या. शिवाय घरं ही आकाराने लहान असल्याची अनेकांची तक्रार होती. याबाबत सिडकोकडेही सर्वांनी पाठपूरावा केला होता. मात्र सिडकोने दर कमी करणार नाही असं ही स्पष्ट केलं आहे.
दोन वर्ष मेन्टेनेन्स फ्री असल्याचं सिडकोने सांगितलं होतं. पण त्याचे ही चार्जेस लावले गेले ते माफ केले जाईल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिल्याचं आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितलं. ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेत सिडकोने सुमारे 26,000 घरे लॉटरीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध केली होती. मात्र वाढलेल्या किमतीमुळे नागरिकांनी या योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास निम्मी घरे विक्रीविना पडून आहेत. विधान परिषदेतील चर्चेदरम्यान याच मुद्द्यावर सदस्यांनी आवाज उठवला. दरम्यान आता या घरांच्या किंमती किती कमी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world