- चेन्नईमधील रेफेक्स ग्रुपने आपल्या १२ निष्ठावान कर्मचाऱ्यांना Audi A4 आलिशान कार भेट दिल्या आहेत
- प्रत्येक Audi A4 कारची ऑन-रोड किंमत सुमारे ६० लाख रुपये असून कंपनीने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे
- या विशेष भेटीचा उद्देश कंपनीशी अनेक वर्षं प्रामाणिक राहिलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे हा आहे
अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतात. पण काही कंपन्या आणि त्यांचे बॉस हे आपल्या कर्मचाऱ्यांची खास काळजी घेतात. ते असं काही करतात की त्याची चर्चा संपूर्ण जगात होते. कंपनीनं थोडी जरी पगारवाढ केली तरी त्याची चर्चा मोठी होते. पण इथं पगारवाढ नाही पण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बॉसने जे काही केलं त्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. चेन्नईमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असे काही केले आहे की, सध्या सोशल मीडियावर या कंपनीची आणि तिच्या मालकाचीच चर्चा रंगली आहे. 'रेफेक्स ग्रुप' (Refex Group) या कंपनीने आपल्या 12 निष्ठावान कर्मचाऱ्यांना चक्क 'Audi A4' या आलिशान कार भेट म्हणून दिल्या आहेत. कॉर्पोरेट जगात या मोठ्या निर्णयामुळे एकच खळबळ माजली आहे.
साधारणपणे कंपन्या सणासुदीला बोनस किंवा मिठाईचे डब्बे देतात. पण रेफेक्स ग्रुपने थेट लक्झरी कारचे वाटप केले आहे. या एका कारची ऑन-रोड किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे. म्हणजेच कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. इंक्रीमेंटच्या प्रतीक्षेत असलेल्या नोकरदार वर्गासाठी ही बातमी थक्क करणारी ठरली आहे. बॉसने घेतलेल्या या निर्णयाने कर्मचारी ही शॉक आहेत. त्यांना ही सुखद धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या बॉसचे आणि कंपनीचे आभार मानले आहेत.
हे विशेष गिफ्ट केवळ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी मर्यादित नव्हते. ज्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांपासून कंपनीशी प्रामाणिक राहून कठीण काळात साथ दिली, अशा 12 जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या प्रगतीत ज्यांनी आपले रक्त आटवले, त्या वफादार सहकाऱ्यांचा सन्मान करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. अनेक कमी कंपन्या असं करतात. मात्र याची चर्चा आता सोशल माडियावर जोरदार होत आहे. शिवाय याचा व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे.
कर्मचाऱ्यांना मिळालेल्या Audi A4 मध्ये 2.0 लिटरचे शक्तिशाली टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. ही कार अवघ्या 7 सेकंदात 100 चा वेग पकडू शकते. कारमध्ये सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि हाय-टेक म्युझिक सिस्टम यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत. जेव्हा या 12 कार एका रांगेत उभ्या होत्या, तेव्हा तो नजारा पाहून नेटकरी थक्क झाले. त्यावेळी कर्मचाऱ्यांना ही काय चाललं आहे हे क्षणभर समजलं नाही. पण ज्यावेळी ह्या कार त्यांच्यासाठी आहेत हे त्यांना समजलं त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.