जाहिरात

रेस्टॉरंटमध्ये भुताटकी! भिंतीवरुन फिरतो सांगाडा...; लहान मुलांच्या डोळ्यात भीती, धक्कादायक Video

एक रेस्टॉरंट... या रेस्टॉरंटमध्ये भुतांचा वावर असतो. येथे जेवण सर्व्ह करण्याचं काम भूतं करीत असतात.

रेस्टॉरंटमध्ये भुताटकी! भिंतीवरुन फिरतो सांगाडा...; लहान मुलांच्या डोळ्यात भीती, धक्कादायक Video

Ghost At Varanasi : एक रेस्टॉरंट... या रेस्टॉरंटमध्ये भुतांचा वावर असतो. येथे जेवण सर्व्ह करण्याचं काम भूतं करीत असतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमध्ये बसलेला एक मुलगा प्रचंड घाबरलेला आहे. तो आरडाओरडा करतो. मुलाच्या डोळ्यात भीती दिसून येत आहे. मात्र तरीही ते 'भूत' त्याला घाबरवण्याचं थांबवत नाही. 


नेमकं काय आहे हे रेस्टॉरंट?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ वाराणसीमधील चेतगंज भागातील आहे. येथील 'कंकाल हॉरर रेस्टॉरंट' सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. येथे भुताच्या वेशात वेटर जेवण सर्व्ह करतो. नुकताच या रेस्टॉरंटच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक भीतीदायक वेटर एका लहान मुलाच्या जवळ जाऊन त्याला घाबरवतो. मुलगा इतका घाबरतो की वडिलांच्या नावाने आरडाओरडा करतो. 
 

Watch the video here:

सोशल मीडियावरुन संताप...

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता सहा कोटीहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. याला व्ह्यूज खूप मिळाले असले तरी कमेंटमध्ये लोकांकडून संताप केला जात आहे. मनोरंजनाच्या नावाखाली कोणत्याही लहान मुलामध्ये भीती निर्माण करणं चुकीचं आहे. युजर्सनी केवळ रेस्टॉरंटलाच नाही तर मुलाच्या आई-वडिलांवर रोष व्यक्त केला आहे. 


हॉरर-थीमचं रेस्टॉरंट...

हे रेस्टॉरंट वाराणसीतील पहिलं हॉरर-थीम रेस्टॉरंट आहे. येथे भिंतीवर सांगाडे लटकलेले आहेत. रेस्टॉरंटमध्ये प्रकाश अत्यंत कमी आहे, भीतीदायक संगीत सुरू आहे. वेटर अचानक येऊन ग्राहकांना घाबरवतो. तरुणांमध्ये हे रेस्टॉरंट अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com