Viral Videoमाणुसकी मेली?मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत पोहोचला भाऊ, 19300 रुपयांसाठी जे घडलं त्यानं देश हादरला

Skeleton At Odisha Bank: बँकेच्या कागदोपत्री नियमांमुळे एका गरीब आदिवासी भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा पुरावा म्हणून बँकेत न्यावा लागला. नेमकी काय आहे ही घटना? जाणून घ्या सविस्तर वृत्त...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Viral Video: बहिणीच्या मृतदेहाचा सांगाडा खांद्यावरून घेऊन भाऊ पोहोचला बँकेत, कारण..."
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातील गरीब आदिवासी भावाने मृत बहिणीचा सांगाडा बँकेत पुरावा म्हणून नेला होता
  • बहिणीच्या खात्यातील 19,300 रुपये काढण्यासाठी बँकेने मृत्यू प्रमाणपत्राचा पुरावा मागितला होता
  • शिक्षण आणि आर्थिक अडचणींमुळे भावाला कायदेशीर कागदपत्रे मिळवणे अवघड गेले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Skeleton At Odisha Bank: सरकारी नियम आणि कागदपत्रांच्या कचाट्यात अडकलेल्या एका गरीब आदिवासी भावाचे हतबल रूप पाहून लोकांचे हृदय हेलावले आहे. केवळ 19 हजार 300 रुपयांसाठी भावाला आपल्या मृत बहिणीच्या मृतदेहाचे सांगाडे पुरावा म्हणून बँकेत घेऊन जावे लागले. संबंधित व्यक्ती आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावरून घेऊन आल्यानंतर ओडिशा ग्रामीण बँकेच्या बाहेर खळबळ उडाली. एखादा व्यक्ती हतबल असताना असं काही करू शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. 

ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे. व्यवस्थेची सक्ती आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेपुढे एका गरीब आदिवासी माणसाची हतबलता इतकी स्पष्ट दिसत होती की, त्याला पुरावा म्हणून आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत आणावा लागला. केवळ 19,300 रुपयांसाठी या भावाला इतकं कठोर पाऊल उचलावे लागले, ज्यामुळे सर्वांचे मन हादरले आहे. 

Advertisement

भावाला बहिणीच्या बँक खात्यातील 19,300 रुपये काढायचे होते 

दियानाली गावातील जीतू मुंडा यांची बहीण कालरा मुंडा यांचा ओडिशामधील ग्रामीण बँकेत खाते होते. दोन महिन्यांपूर्वी कालरा यांचे निधन झाले. त्यांच्या पतीचे आणि मुलाचेही आधीच निधन झाले होते, त्यामुळे जीतू हे त्यांचे एकमेव वारस होते. कालरा मुंडा यांच्या खात्यात 19,300 रुपये जमा होते. जेव्हा जीतू बँकेत पैसे काढायला गेले, तेव्हा बँक व्यवस्थापकाने त्यांना मृत्यू प्रमाणपत्र किंवा कायदेशीर वारस असल्याचा पुरावा मागितला. अशिक्षित आणि गरीब असलेल्या जीतू यांना ही प्रक्रिया समजली नाही. जीतू एक गरीब आदिवासी आहेत. त्यांच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र, वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवणे हे एक अवघड काम होते. त्यांच्याकडे शिक्षण नव्हते, पैसे नव्हते आणि व्यवस्थेची काहीच समज नव्हती. बँकेच्या कठोर प्रतिक्रियेनंतर तो पूर्णपणे खचून गेले होते.

खांद्यावर बहिणीच्या मृतदेहाचा सांगाडा आणि भावाची पायपीट 

शेवटी हार मानून जीतू सोमवारी (27 एप्रिल) गावातील स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी बहिणीच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. सांगाडा एका कापडात गुंडाळला, खांद्यावर घेतला आणि जवळपास तीन किलोमीटर चालत बँकेपर्यंत पोहोचले. कडक उन्हातून बँकपर्यंतचा त्यांचा प्रवास पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. बँकेसमोर जेव्हा त्यांनी सांगाडा काढला, तेव्हा उपस्थित लोक थक्क झाले.  

(नक्की वाचा : Pani Puri Death Case: रस्त्यावरची पाणीपुरी तुम्हाला खातेय? 6 वर्षीय मुलाचा मृत्यू, 18 मुलांची प्रकृती गंभीर! गावात पसरली भीती)

Photo Credit: NDTV Marathi

बँकेच्या बाहेर पसरली शांतता

जेव्हा बँकेच्या बाहेर जीतू बहिणीच्या मृतदेहाचा सांगाडा घेऊन पोहोचले तेव्हा तेथे भयाण शांतता पसरली. काहींनी डोके धरले तर काहींना राग व्यक्त केला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बँक प्रशासनावर टीका केली आणि म्हटले की, बँकेला हवे असते तर त्यांनी गावच्या सरपंचाकडून या प्रकरणाची पडताळणी केली असती, प्रत्यक्ष पाहणी केली असती किंवा माणुसकीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला असता.

Advertisement

पोलिसांनी हाताळली परिस्थिती

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जितू यांना समजावून शांत केले. अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले की, या प्रकरणाकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाईल तसेच याप्रकरणी बँकेकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.