Viral video: सासरा स्टेजवर आला, साखरपुडा मधेच थांबवला, पुढे असा ट्विस्ट आला की लोक झाले हैराण

साखरपुड्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर लोकांना जबरदस्त पसंत पडत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तब्बल 64 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे. त्या आधी साखरपुड्याचा कार्यक्रमही होत आहेत. या सीजनमध्ये अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हारयल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. स्टेजवर साखपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. नवरा आपल्या पत्नीला हातात अंगठी घालणारच होता, की त्यावेळी मुलीचे वडील अचानक स्टेजवर आले. त्यांनी साखरपुडा रोखा. त्यानंतर जो काही ट्वीस्ट आला, त्यामुळे साखरपुड्याला आलेले सर्वच जण आवाक झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

होणाऱ्या सासऱ्यानेच साखरपुडा थांबवल्याने नवरदेवही चाट पडला. पण खरा ट्वीस्ट पुढे होता. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा आपल्या गुडघ्यावर बसून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या बोटात अंगठी घालत होता. तो अंगठी बोटात घालणार त्याच वेळी त्याचे सासरे स्टेजवर येतात. ते मुलीचा हात पकडतात आणि तिला स्टेजवरून घाली घेवून जाऊ लागता.  त्यावेळी वातावरण एकदम तंग होतं.  सर्वच जण सिरिअस होतात. नक्की काय चाललं आहे हे त्यांना समजत नाही. एकीकडे उत्साहाचं वातावरण असताना अचानक साखरपुड्याच्या ठिकाणी शांतता निर्माण होते.    

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

वडील आपल्या मुलीचा हात पकडून तिला स्टेज खाली घेऊन जात असात. त्याच वेळी एक ट्वीस्ट येतो. हॉलमधील डीजेवाल एक गाणं लावतो. ते गाणं असतं. अभिनेता गोविंदाचं. हे गाणं सुपर हिट आहे. 'सुनो ससुरजी' हे गाणं वाजायला लागतं. त्यानंतर सासरा आणि होणारा जावई या गाण्यावर ठेका धरतात. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले हे बघतच राहातात. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. ऐवढच काय तर तिथे असलेली एँकरही आवाक होते. तिला ही असं काही होणार आहे याची कल्पना नसते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Dombivli News: इलेक्ट्रिशन, प्लंबर,लेबर बनले बिल्डर, डोंबिवलीतल्या 'त्या' 65 अनधिकृत इमारतींचे गौडबंगाल

साखरपुड्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर लोकांना जबरदस्त पसंत पडत आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तब्बल 64 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 3 लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. तर दिड लाख लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर युजर्सनी आपल्या मजेशीर प्रतिक्रीयाही दिल्या आहेत. काहींच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, तर काहींच्या मते कम बॅक असावे तर असे, अशा पद्धतीने आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. 

Advertisement