शाळा म्हटलं की कडक शिस्तीचे, चुकलं की ठोकलं असे शिक्षक आठवतात. मात्र काळानुरुप शिक्षणाची पद्धती बदलली आहे. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता मुलांना शाळा हवीहवीशी वाटते, याला कारण म्हणजे शाळांमधील शिक्षक देखील आहेत. मुलांना शाळेची गोडी लागावी, शाळेत आल्यानंतर घरची आठवण येऊ नये, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षक नवनवीन प्रयोग शाळामध्ये करत असतात. असा नवा प्रयोग करणारी एक शिक्षिका सध्या सोशल माडियीवर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे व्हिडीओ सध्या जोरदार व्हायर होत आहेत. शिवाय या शिक्षिकेचे कौतूकही होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एका प्रयोगशील शिक्षिकेचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने आपले व्हिडीओ तिच्या इंन्साग्रामवर शेअर केले आहेत. या शिक्षिकेचे नाव अर्पिता हुगर असं आहे. ती कर्नाटकातल्या श्री आदिनाथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकवते. ही शाळा सदलगा या ठिकाणी आहे. ही शिक्षिका फावल्या वेळेत विद्यार्थ्यांसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. ही मजामस्ती शिक्षणात गोडी निर्माण करणारी आहे. त्या माध्यमातून ती चिमुकल्यांना शिकवते. त्यासाठी ती कधी गाण्याचा तर कधी डान्सचा आधार घेते.
लहानग्यांसोबत ही शिक्षिका पॉप स्टार शकीराच्या 'वाका वाका...' गाण्यावर थिरकताना दिसते. चिमुकले ही तिच्या तालात ताल मिळवत डान्स करताना दिसतात. अर्पिता हुगर असं या शिक्षिकेचं नाव आहे. कर्नाटकच्या सदलगा येथील श्री आदिनाथ इंग्लिश मीडियम शाळेतील अर्पिया या शिक्षिका आहेत. @arpita_lucky या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या शाळेतील मुलांसोबतच्या अनेक अॅक्टिव्हिटीचे ते व्हिडीओ टाकत असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात लाईकही मिळाले आहे. शिवाय कमेंटचा पाऊस पडला आहे.
शकीराच्या वाका वाका गाण्याचा व्हिडीओ अर्पिता यांनी आपल्या इंस्टावर टाकला आहे. त्याला जवळपास तीन लाखा पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तर दिड हजारा पेक्षा जास्त कमेंट त्यावर आल्या आहेत. चिमुकले विद्यार्थीही या नव्या शिक्षण पद्धतीचा आनंद घेताना या व्हिडीओत दिसत आहे. अर्पिता शिक्षणात नवनव्या कल्पना आणताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून 481 पोस्ट केल्या आहेत. तर पावणे दोन लाख हे त्यांचे फॉलोवर्स आहेत.