Viral Video: तृतीयपंथीयांच्या ग्रुपने एका झोपलेल्या तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईतील रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये दिसत आहेत की, एक तरुण रेल्वे स्थानकाच्या एका बाकावर झोपलेला दिसत आहे. तर त्याच्या आजूबाजूला तीन तृतीयपंथी उभे आहेत. तृतीयपंथी या तरुणाला काहीतरी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर एक तृतीयपंथी अचानक पायातील चप्पल काढतो आणि झोपलेल्या तरुणाला जोरदार फटका मारतो.
या अनपेक्षित हल्ल्यामुळे तरुण गोंधळून जागा होतो. जागा झाल्यानंतरही आणखी एकजण त्याच्या कानशिलात लगावतो. क्लिपच्या शेवटी, तो तरुण मारहाणीपासून वाचण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून धावताना दिसत आहे. तर तो ग्रुप त्याचा पाठलाग करत असल्याचे दिसते.
नेटकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया
तृतीयपंथी आणि या तरुणामध्ये नेमका काय वाद झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेकांनी या कृत्याचा निषेध केला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा हिंसेवर प्रश्न उपस्थित केले. फुटेजमध्ये अनेक प्रवासी आजूबाजूने जाताना दिसत आहेत. पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.
रेल्वे प्रशासनाची भूमिका
इंडियन रेल्वेचे अधिकृत हँडल असलेल्या 'रेल्वे सेवा'ने या व्हिडीओवर उत्तर दिले आहे. "अशा घटना प्रवाशांना सुरक्षित प्रवासाला धोका देतात. रेल्वे सेवा हँडलने युजर्सना स्टेशनचे नाव आणि संपर्क क्रमांक यासारखे विशिष्ट तपशील डायरेक्ट मेसेजद्वारे किंवा व्हॉट्सॲप बॉटद्वारे शेअर करण्याचे आवाहन केले आहे.