दिल्लीतून कॅब ड्रायव्हर्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात एका कॅब ड्रायव्हरला प्रवाशाने पिस्तुल दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेक युजर्सनी ड्रायव्हरची बाजू घेत संताप व्यक्त केला.
नेमके काय घडले?
अरुण पासवान नावाच्या ड्रायव्हरने X वर 55 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये कुर्ता-पायजमा घातलेला एक व्यक्ती दिसत आहे, जो आपल्या हातांमध्ये काहीतरी लपवताना दिसत आहे. पोस्टनुसार, त्याच्या हातात पिस्तुल होती. तो व्यक्ती ड्रायव्हरवर ओरडत आहे आणि त्याला दूर जाण्यास सांगत आहे. ड्रायव्हर सतत त्याला कॅमेऱ्यावर पिस्तुल दाखवण्यास सांगत आहे. पण तो व्यक्ती चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
ड्रायव्हरने सोबत लिहिले की, "उबरची सवारी आहे. राइड बुक करतील, पण जर जायचे नसेल तर कॅन्सल करणार नाहीत. आणि धमकावण्यासाठी पिस्तुल दाखवतील, पण कॅन्सल नाही करणार." या पोस्टवरून स्पष्ट होते की, प्रवाशाने राइड बुक केली होती, पण प्रवास करायचा नसतानाही त्याने ती कॅन्सल केली नाही.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल होताच, त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स येऊ लागल्या. एका युझरने ड्रायव्हरला समर्थन देत लिहिले की, दोन राइड बुक करण्याची गरज काय आहे आणि त्यावर पिस्तुल दाखवणे तर त्याहून अधिक चुकीचे आहे. अनेक युझर्सनी ड्रायव्हरच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.