Viral Video: बॉलिवूडमधील सुपरहिट ठरलेला 'हेरा फेरी' सिनेमातील "जब भी कोई हसीना" या गाण्यावर शाळकरी मुलाने जबरदस्त डान्स केलाय. त्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषी कश्यपने (@rish_0104) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत "पावसामध्ये डान्स करण्याची मजा काही वेगळीच असते" असे कॅप्शनही दिलंय. 30 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकताय, शाळेच्या गणवेशातच ऋषी कश्यपने पावसाचा आनंद घेत जबरदस्त डान्स केला. सुपरहिट गाणे, पाऊस आणि कश्यपच्या जबरदस्त डान्स स्टेप्स या सर्व गोष्टींमुळे त्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडतोय. शाळकरी मुलाच्या डान्स स्टेप्स आणि आत्मविश्वासाचे लोक कौतुक करत आहेत. कश्यपच्या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा अक्षरशः वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, "किती चांगला डान्सर आहे." काहींनी त्याला प्रोत्साहन देत म्हटलंय की, "त्याची प्रतिभा आणि मेहनत एक दिवस नक्कीच फळाला येईल".
ऋषी कश्यपचा डान्स व्हिडीओ पाहा
हेरा फेरी या गाजलेल्या सिनेमातील 'जब भी कोई हसीना' हे गाणं अभिनेता अक्षय कुमारवर चित्रित करण्यात आलंय. यापूर्वीही कित्येक मुलांनी त्यांच्या हटके डान्स स्टाइलने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. काही दिवसांपूर्वी एका छोट्या मुलीचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती आईबाबांना बागी सिनेमातील लोकप्रिय "छम छम" गाण्यावर डान्स शिकवताना दिसतेय.