Viral Video: शेवटच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हुशार, शांत असे काय-काय शब्द वापरुन त्यांचे कौतुक केलं जातं. तर पहिल्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख अभ्यासू अशी असते. पण या व्हायरल व्हिडीओमधील विद्यार्थ्याला पाहिल्यानंतर तुम्ही बॅकबेंचर्सची प्रशंसा करणे थांबवाल. कारण पहिल्याच बाकावर बसलेल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अशी युक्ती खेळली की ते पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याच्या हुशारीने सर्व बँकबेंचर्सना मागे टाकलंय. हा व्हिडीओ प्रचंड गंमतीशीर आहे.
शिक्षिकेच्या प्रश्नावर विद्यार्थ्याने दिलं धमाल उत्तर
वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षिकांमधील संभाषणाचा हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना उद्देशू म्हणते की, वर्गामध्ये जो मूर्ख आहे, त्याने उभं राहावं. प्रश्न विचारताच सर्वजण इकडेतिकडे पाहू लागतात, थोड्या वेळाने पहिल्या बाकावर बसलेला विद्यार्थी जागेवरुन उठून शिक्षिकेच्या शेजारी उभा राहतो. यावर शिक्षिका त्याला विचारते की, तू मूर्ख आहेस का? यावर विद्यार्थ्याने दिलेले उत्तर ऐकून संपूर्ण वर्ग मोठमोठ्याने हसू लागतो. या विद्यार्थ्याने म्हटलं की, 'मॅम मला चांगलं नाही वाटतंय की तुम्ही एकट्या उभ्या आहात"
पाहा Video:
युजर्स म्हणाले, विद्यार्थी रॉक, मॅडम शॉक्ड
एका युजरने म्हटलंय की, गेम चेंजर बॉय. दुसऱ्या युजरने लिहिलंय की, विद्यार्थी रॉक मॅडम शॉक्ड. जवळपास चार लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केलाय तर एक कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.