Viral Video: जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम! 36 लेन असूनही 80 लाख गाड्या जाग्यावरच, कारण...

या प्रचंड वाहतूक कोंडीमागचे मुख्य कारण ही आता समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Longest Traffic Jam: सणासुदीच्या किंवा लाँग विकेंडच्या काळात होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) भारतीयांसाठी, विशेषत: मुंबई, दिल्ली, बेंगळुरू येथील रहिवाशांसाठी नवीन नाही. अनेक वेळा कोकणात गणपतीला जातानाही आपण वाहतूक कोंडी अनुभवतो. तर विकेंडला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडीच्या कथाही सर्वांना माहित आहेत. पण आता एक अशी वाहतूक कोंडी समोर आली आहे त्यामुळे संपूर्ण जग हैराण झालं आहे. ही वाहतूक कोंडी संपूर्ण जगातली आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक कोंडी समजली जात आहे. त्याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे. 

ही वाहतूक कोंडी चीनमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. चीनमध्ये नुकताच झालेल्या जगातील सर्वात मोठ्या ट्रॅफिक जॅमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने नेटकऱ्यांना अचंबित केले आहे. 36 लेनचा महामार्ग असूनही तब्बल 80 लाख गाड्या एकाच ठिकाणी अडकून पडल्या होत्या. विशेष म्हणजे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. त्या एक इंचही पुढे सरकत नव्हत्या. त्यातील अनेक वाहने तर 24 तास जागची हलू शकली नाहीत. त्यामुळे इतका मोठा रस्ता असून ही वाहतूक कोंडी कशी झाली या मागचे कारण नेटकरी शोधत आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर हजारो गाड्यांची एक लांबलचक रांग दिसत आहे. चीनमधील अन्हुई प्रांतातील Wuzhuang Toll नाक्यावर हा विक्रमी ट्रॅफिक जॅम झाला होता. रस्त्यावर 36 लेन असतानाही, गाड्यांना पुढे सरकणे अशक्य झाले होते. Daily ग्लोबल न्यूजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात गाड्या मुंगीच्या गतीने सरकत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये प्रचंड वाहनांची गर्दी दिसत आहे. शिवाय गाड्या जागच्या जागी उभ्या असल्याचं ही दिसत आहे. त्यामुळे या ट्राफीक जॅमची भव्यता लगेचच दिसून येते. 

नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल

या प्रचंड वाहतूक कोंडीमागचे मुख्य कारण म्हणजे चीनमध्ये साजरा होणारा ‘गोल्डन वीक'आहे. भारतामध्ये जशी दिवाळीची किंवा इतर सणांची मोठी सुट्टी असते, तसाच 1 October पासून चीनमध्ये हा 'गोल्डन वीक' सुरू होतो. 7 दिवसांच्या या सुट्टीत लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत असतात. 1 October 1949 रोजी झालेल्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (People's Republic of China) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा आठवडा चीनमध्ये साजरा केला जातो. या सुट्ट्यांमुळेच दरवर्षी चीनी नागरिकांना अशा मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

Advertisement