Viral Video : मोठेपणी काय होणार? विद्यार्थ्याचं उत्तर ऐकताच वर्गशिक्षिकेने काढला पळ, पाहा Video

तिन्ही मुलींनी छान उत्तर दिलं, मात्र शेवटी एका विद्यार्थ्याला तोच प्रश्न विचारला. त्याचं उत्तर ऐकूण वर्गशिक्षिका हैराण झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Social Media VIral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये वर्गशिक्षिका मुलांना त्यांच्या करिअरबद्दल विचारताना दिसत आहे. वर्गशिक्षिका विद्यार्थ्यांना मोठेपणी काय होणार असा प्रश्न विचारत आहेत. यामध्ये लहानग्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला अधिकारी. मात्र सर्वात शेवटी विद्यार्थ्याने भविष्याच्या प्लानबद्दल असं काही उत्तर दिलं, जे ऐकून शिक्षिका हैराण झाली. वर्गातील हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये..?

व्हायरल व्हिडिओची सुरुवात वर्गातील विद्यार्थ्यापासून होते. वर्गशिक्षिका सर्वांना रांगेत उभं करते आणि त्यांना मोठेपणी काय व्हायचंय असा प्रश्न विचारते. पहिली विद्यार्थिनी त्यांना म्हणते, मला डॉक्टर व्हायचंय. दुसरी सांगते मला डॉक्टर व्हायचंय. तिसरी विद्यार्थिनीने सांगितलं तिला पोलीस व्हायचंय. शेवटच्या विद्यार्थ्याला विचारलं असता शिक्षिकाही हैराण झाली. 

क्की वाचा - Video : 'योग्य पद्धतीने कचरा कसा काढावा', प्रसिद्ध अभिनेत्री देतेय ऑनलाइन धडे; चाहत्यांना भलताच राग

मोठेपणी चोर होण्याचा प्लान...

तिन्ही विद्यार्थिनीनंतर चौथ्या विद्यार्थ्याला सारखाच प्रश्न विचारला जातो. यावर विद्यार्थ्याने असं काही उत्तर दिलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल. वर्गशिक्षिका त्याला विचारते, मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुला? यावर विद्यार्थी म्हणतो, मला चोर व्हायचंय. हा व्हिडिओ पाहून हसू रोखणं कठीण आहे. विद्यार्थ्याने दिलेलं उत्तर ऐकूण शिक्षिकाही हैराण झाली.  

Topics mentioned in this article