Langda Mango Name Story: भारतात उन्हाळा सुरू होताच सर्वाधिक चर्चेत असणारे फळ म्हणजे आंबा. बाजारात आंब्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत, पण काही आंबे केवळ त्यांच्या चवीसाठीच नव्हे, तर त्यांच्या नावामुळेही प्रसिद्ध आहेत. असाच एक आंबा म्हणजे बनारसचा प्रसिद्ध 'लंगडा आंबा'. आंब्यांना पाय नसतात, मग त्यांना 'लंगडा' हे नाव कसे मिळाले? यामागील कथा शेकडो वर्षे जुनी आहे ज्याची आजही तितकीच चर्चा होते.
लंगडा आंबा नाव कसे पडले?
आंब्याला काय नसतात मग लंगडा आंबा हे नाव कसे मिळाले?हे नाव सुरुवातीला विचित्र वाटू शकते, पण त्यामागील कथा खूपच मनोरंजक आहे. असे म्हटले जाते की, बनारस येथील एका मंदिरात राहणाऱ्या पायांनी लंगड्या असलेल्या एका भिक्षूने आंब्याची झाडे लावली. जेव्हा या झाडांना फळे लागली, तेव्हा त्यांची चव इतकी लोकप्रिय झाली की ते संपूर्ण प्रदेशात प्रसिद्ध झाले. लोक त्याला "लंगड्या भिक्षूचा आंबा" म्हणू लागले. एके दिवशी त्या भिक्षूचे निधन झाले, पण आंब्याची ओळख त्याच्यासोबतच राहिली. हळूहळू हे नाव संक्षिप्त होऊन 'लंगडा' असे झाले. आज लंगडा आंबा केवळ बनारसमध्येच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे.
पिकल्यानंतरही हिरवाच राहतो.. !
लंगडा आंब्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे त्याचा रंग. बहुतेक आंबे पिकल्यावर पिवळे किंवा लाल होतात, पण लंगडा आंबा पूर्ण पिकल्यानंतरही हिरवाच राहतो. यामुळेच अनेक लोक पहिल्यांदा पाहिल्यावर त्याला कच्चा आंबा समजतात. या आंब्याचा गर अत्यंत मऊ आणि जवळजवळ तंतुहीन असतो, ज्यामुळे तो खाण्यास सोपा आणि आनंददायक वाटतो. त्याचा गोडवा संतुलित असतो, तो ना जास्त तीव्र असतो ना जास्त सौम्य. म्हणूनच तो थेट तुकडे करून खाल्ला जातो आणि शेक्स, मिष्टान्न व चटण्यांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अलिकडच्या वर्षांत, परदेशात त्याची मागणी वाढली आहे, ज्यामुळे निर्यातीत सातत्यपूर्ण वाढ झाली आहे. बिहारमधील भागलपूर येथे आढळणारा "दुधिया लंगडा" त्याच्या विशिष्ट सुगंधासाठी ओळखला जातो, ज्याचा वास दुधासारखा येतो असे लोक वर्णन करतात. लंगडा आंबा केवळ त्याच्या चवीसाठीच नव्हे, तर त्याच्या कहाणी आणि ओळखीसाठीही खास आहे. एका संताने लावलेल्या लहान रोपट्यापासून सुरू झालेल्या या प्रवासाने आता केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे.
Bhiwandi Crime: भिवंडीत खळबळ! 10-15 तरुणांचा राडा, गुंड सुजित तात्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न