जाहिरात

Bhiwandi Crime: भिवंडीत खळबळ! 10-15 तरुणांचा राडा, गुंड सुजित तात्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ जीपच्या काचा फोडल्या व घराबाहेर जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत गोंधळ घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

Bhiwandi Crime: भिवंडीत खळबळ! 10-15 तरुणांचा राडा, गुंड सुजित तात्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न

भुपेंद्र अंबवणे, भिवंडी:

Mumbai News: मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुजित तात्या याने शनिवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास केवणी दिवे या गावात भारवी भोईर यांच्या घराबाहेर 10 ते 15 गुंडांसह येऊन गोंधळ घालण्याची घटना घडली आहे. भारवी भोईर यांच्या भावाच्या मुलीसोबत मागील वर्षी सुजित तात्या याने दुसरे लग्न केले .त्यास भारवी भोईर यांनी विरोध केल्याने तेव्हा पासून सुजित तात्या यांच्या मनात राग खदखदत होती. त्यानंतर शनिवारी पहाटे हा प्रकार घराबाहेर घडला.

Pune Crime: 'माझं आयुष्य मी खराब केलं', रियाचा जप, गुढ चिठ्ठी.. अल्पवयीन मुलगी बेपत्ता, सस्पेन्स वाढला

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  सुजित तात्या व त्याचे गुंड पहाटे गाड्यांमधून भारवी भोईर यांच्या घराबाहेर आले. त्यांनी बंद असलेला गेट उघडण्याचा प्रयत्न केला. तो न उघडल्याने त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ जीपच्या काचा फोडल्या व घराबाहेर जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत गोंधळ घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

याप्रकरणी भारवी भोईर यांनी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी फक्त अर्ज घेतला पण कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पोलिससुद्धा सुजित तात्या याला पाठीशी घालत आहेत असा आरोप भारवी भोईर यांचा आहे. सुजित तात्या हा गुंड प्रवृत्तीचा असून परिसरातील अनधिकृत रेती व्यवसायामध्ये तो असून तो रात्री या भागात अनेकांना धमकावत असतो.

दरम्यान, त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. खासदार सुरेश म्हात्रे यांनी त्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मागे लोकसभा सभागृहात केली होती. त्यास दिलेला जामीन रद्द करून त्याच्यावर कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी भारवी भोईर यांनी केली आहे.

नक्की वाचा - Trending News: 'कैसे हराया', बोलणाऱ्या सहर शेख आता मराठी बोलणार? मनसेची भन्नाट आयडीया, सर्वांच आवाक

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com