जाहिरात

महिलेने अवघ्या 1300 रुपयांचा बूट घरेदी केला; घरी जाऊन ब्रँड आणि किंमत पाहून थक्क झाली!

Christian Louboutin हा एक फ्रेंच लग्झरी ब्रँड आहे, जो जगभर आपल्या 'Red Sole' म्हणजेच चमकदार लाल सोल शूजसाठी ओळखला जातो.

महिलेने अवघ्या 1300 रुपयांचा बूट घरेदी केला; घरी जाऊन ब्रँड आणि किंमत पाहून थक्क झाली!
1300 रुपये में लगी किस्मत की लॉटरी! सेकंड हैंड बूट निकले 1.3 लाख के Christian Louboutin

Christian louboutin brand 1300 rupees boots: 

नशिब कुणाचं कधी बदलेले यांचा नेम नाही. एका छोट्या कृतीतून  मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. अशीच काहीशी घटना एका महिलेसोबत घडली आहे. स्वस्तात खरेदी केलेला  शूजमुळे महिलेला 'जॅकपॉट' लागला आहे.

एका महिलेने थ्रिफ्ट स्टोअरमधून (जुने कपडे आणि वस्तूंचे दुकान) फक्त 17.99 डॉलरमध्ये म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1350 रुपयांमध्ये काळ्या रंगाचे लेदर बूट्स खरेदी केले. हे बूट दिसायला चांगले आणि दर्जेदार वाटत होते. पण जेव्हा तिने बूट्सचा ब्रँड पाहिला, तेव्हा तिला सुखद धक्का बसला. ते बूट प्रसिद्ध लग्झरी ब्रँड Christian Louboutin चे होते.

Didn't think I would ever score big enough to post here but I hit the jackpot with these!
byu/Catlady4ever inThriftStoreHauls

1.3 लाख रुपयांचे बूट

रेडिटवर आपला हा अविश्वसनीय अनुभव शेअर करताना महिलेने लिहिले की, "मी हे बूट खरेदी केले, कारण त्यांची गुणवत्ता खूप चांगली वाटली. त्यानंतर अचानक माझे लक्ष त्यांच्या सोलकडे गेले. कारण त्यांचा रंग लाल होता.  आणि तेव्हा मी पाहिले की हे तर Christian Louboutin चे बूट आहेत."

अधिक माहिती तपासली तेव्हा महिलेला कळले की, तिने खरेदी केलेला बूट हा याच ब्रँडचा 'En Hiver Lug Low' मॉडेल आहे. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या बूट्सची किंमत सुमारे £1,260 म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 1.3 लाख रुपये आहे. याचा अर्थ, केवळ 1,350 रुपयांत खरेदी केलेले हे बूट तिच्या खरेदी किमतीपेक्षा शंभर पटीने अधिक किमतीचे निघाले आहेत.

काय आहे Christian Louboutin ब्रँडची खासियत?

Christian Louboutin हा एक फ्रेंच लग्झरी ब्रँड आहे, जो जगभर आपल्या 'Red Sole' म्हणजेच चमकदार लाल सोल शूजसाठी ओळखला जातो. 1990 च्या दशकापासून आजपर्यंत हा ब्रँड आपली विश्वासार्हता जपून आहे. या ब्रँडचा प्रत्येक बूट हाताने बनवलेला असतो आणि त्याचा खास चमकदार लाल सोल त्याला इतर ब्रँड्सपासून वेगळी ओळख देतो.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com