जाहिरात

EX बॉयफ्रेंडवर सूड उगविण्यासाठी तरुणीने महिला तांत्रिकाला ठेवलं कामावर, मात्र भलतंच घडलं

एक तरुणी आपल्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी एका महिला तांत्रिकाला हायर करते, यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

EX बॉयफ्रेंडवर सूड उगविण्यासाठी तरुणीने महिला तांत्रिकाला ठेवलं कामावर, मात्र भलतंच घडलं

Woman hires witch for revenge: ब्रेकअपनंतर येणारा राग आणि दु:ख सहन करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. कुणी रडून मन हलकं करतं तर कोणी सूड उगविण्याचा निर्धार करतात. मात्र इंग्लंडमधील तल्लुलाज रोजने जे काही केलं ते पाहून कोणालाही धक्का बसेल. तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सूड उगविण्यासाठी एक महिला तांत्रिकाची मदत घेतली. जादूटोना करून एक्स बॉयफ्रेंडच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तिने प्रण घेतला.  

जादूटोना करून एक्स बॉयफ्रेंडला धडा देण्याचा प्रयत्न.. (ex boyfriend revenge)

'द मिरर' च्या वृत्तानुसार, आपल्या एक्स बॉयफ्रेंडला त्रास देण्यासाठी महिला तांत्रिकाची मदत घेतली. पैसे देऊन तिने महिला तांत्रिकाला हायर केलं. तिने तांत्रिकाला सर्व माहिती दिली. एक्स बॉयफ्रेंडचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं यासाठी ती प्रयत्न करीत होती. 

Latest and Breaking News on NDTV

महिला तांत्रिकाने परिस्थिती पालटली... (emotional breakup story)

तांत्रिक जेव्हा काही दिवसांनंतर परतली. त्यानंतर रोजला वाटलं की तिचा सूड पूर्ण झाला. मात्र त्याच्या उलट झालं. महिला तांत्रिकाने सांगितलं की, तुझ्या एक्सला नाही, तुला उपचाराची गरज आहे. ते ऐकून रोज हैराण झाली. तांत्रिकने सांगितलं की, बदला घेऊन काहीही होणार नाही. उलटपक्षी तुला स्वत:ला समजावण्याची आणि थेरपी घेण्याची आवश्यकता आहे. ती पैसे परत करेल असंही महिला तांत्रिक म्हणाली. 

सोशल मीडियावर व्हायरल (TikTok witch revenge story)

तल्लुलाह रोजने आपली ही कहाणी TikTok (@talulah.roseb) वर शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक युजर्सने लिहिलंय, ब्रेकअपचं दु:ख पचवणं बऱ्याचदा कठीण जातं, आणि आपण चुकीच्या मार्गावर उतरतो. तर कोणी थट्टेत म्हटलं, तुला नाही तर तांत्रिकला Oscar मिळायला हवा. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com