Word of the year 2025 : दररोज वापरता इंटरनेट? 2025 मधील सर्वात चर्चेत असलेला शब्द कोणता? अंदाज बांधणं अशक्य

ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' घोषित केला आहे. कोणता आहे शब्द, अर्थही जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

Oxford University, Rage Bait: ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' घोषित केला आहे. हा शब्द आहे रेज बेट (Rage Bait). याचा अर्थ अशी एखादी पोस्ट, व्हिडिओ किंवा मीम जे जाणूनबुजून भडकाऊ, टोमणे मारणारा किंवा राग निर्माण करणारा असतो. अशी पोस्ट-व्हिडिओ-मीम पाहून तुम्हाला कमेंट, शेअर किंवा त्याविरोधात लढण्यासाठी भाग पाडलं जातं. रेज बेटचं हेच काम असतं. ट्रॅफिक वाढवा आणि लाइक्स व्ह्यूज मिळवा. 

Rage Bait Meaning: रेज बेट काय असतं?

ऑक्सफोर्डच्या परिषभाषेत रेज बेटबाबत स्पष्ट लिहिलं आहे. असा आशय जो जाणून-बुजून निराशा किंवा आक्रोश निर्माण करण्यासाठी तयार केला जातो. ज्यामुळे अधिकांश लोक त्यावर प्रतिक्रिया देतील. ज्यामुळे वेबसाइट किंवा पेजवरील ट्रॅफिक वाढेल. याचा थेट अर्थ असा आहे की, जे रील, ट्विट किंवा पोस्टमुळे वापरकर्त्याला हताश वाटू लागतं. रेज बेट हे दोन शब्दांपासून बनले आहे. पहिला रेज म्हणजे राग आणि दुसरा म्हणजे चारा..मासे पकडण्यासाठी लावला जाणारा गळ...

उदाहरणाने समजून घ्या...

जर तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करीत असाल आणि तुम्हाला अशी एखादी पोस्ट दिसली, ज्यात मुलींविषयी जजमेंटल वक्तव्य केली असतील. उदा. - मुली केवळ पैशांसाठी लग्न करतात. अशा पोस्टचा हेतू केवळ तुमच्या मनात राग निर्माण करून कमेंट किंवा प्रतिक्रिया देण्यासाठी भाग पाडणं म्हणजे रेज बेट. यामुळे त्या व्यक्तीचे पोस्ट व्हायरल होण्यास मदत होते. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : ट्रेनमध्ये 15 जणांना चहा, मॅगीही शिजवली, पुण्यातील महिलेवर गुन्हा दाखल; नियम काय सांगतात?

या शब्दाची निवड कशी झाली? 

यंदा वर्ड ऑफ द इअरची निवड पब्लिक वोटिंगमधून झाली. जगभरातील ३० हजारांहून अधिक लोकांनी तीन दिवसांपर्यंत मतदान केलं. शेवटच्या टप्प्यात तीन शब्दांची निवड करण्यात आली. पहिला रेज बेट, दुसरा ऑरा फार्मिंग (आपण खूप कूल, आत्मविश्वासू आणि गंभीर असल्याचा आव आणणे.) तिसरा शब्द बायोहॅक. याचा अर्थ खाणं-पिणं, व्यायाम, औषधं किंवा विविध गॅझेटच्या माध्यमातून शरीर आणि डोकं व्यस्त ठेवणं. ऑक्सफोर्डच्या तज्ज्ञांनी बिग डेटा म्हणजे ३० अरब शब्दांचा कोर्पस चेक केला आणि यानुसार २०२५ या वर्षात रेज बेट या शब्दाचा सर्वाधिक वापर झाला. 

गेल्या तीन वर्षातील जिंकलेले शब्द

२०२४ - ब्रेन रॉट - बेकार, वायफळ आशय पाहत राहिल्याने मेंदूचं आरोग्य धोक्यात येतं.
२०२३ - रिज - स्टाइल, चार्म
२०२२ - गोब्लिन मोड - आळसपणा, लोभी आणि घाणेरड्यापणाची लाज नसणे

Advertisement


 

Topics mentioned in this article