काही दिवसांपूर्वी ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक महिला मोबाइल चार्जिंग पॉइंटवर प्लग जोडून मॅगी तयार करीत होती. हा व्हिडिओ काही तासात खूप व्हायरल झाला होता.
काय होतं त्या व्हिडिओमध्ये?
मध्य रेल्वेवरील एका एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिला चहाच्या किटलीत मॅगी बनवताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच किटलीमध्ये महिलेने १५ जणांसाठी चहाही केला होता. चहा झाल्यानंतर महिलेने मॅगी बनवायला घेतली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करीत संताप व्यक्त केला.
रेल्वेने उचललं कारवाईचं पाऊल
व्हिडीओ व्हायरल होताच सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत एक्स हँडलवर कठोर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की,ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक किटलीचा वापर करण्यास बंदी आहे. हे फक्त असुरक्षित आणि बेकायदेशीर नाही, तर दंडनीय गुन्हा आहे.रेल्वेने महिलेला इशारा देत म्हटलं की,अशा प्रकारच्या कृतींमुळे आगीच्या घटना घडू शकतात आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हायव्होल्टेज उपकरणांचा वापर ट्रेनमधील सॉकेटवर केल्यास स्पार्क किंवा आग लागण्याची भीती असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता प्रवाशांना अशा प्रकारचं पाऊल उचलू नये.
नक्की वाचा - What is IV Bar: लग्नात 'आयव्ही बार'चा ट्रेंड! पाहुणे मंडळी थेट ड्रिप लावून घेतात; नेमका प्रकार काय?
Is this train travel hack to cook food in train is okay?
— Woke Eminent (@WokePandemic) November 20, 2025
Is this legal? pic.twitter.com/tuxj9qsoHv
महिलेविरोधात गुन्हा दाखल...
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव सरीताताई लिंगायत आहे. त्यांना पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेण्यात आलं. मध्य रेल्वेने या महिलेविरोधात भारतीय रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणा किंवा चुकीमुळे इतर प्रवाशांच्या जीवाला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करण्यासंबंधित आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं, अशा कृतींना सक्त मनाई आहे. प्रवाशांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं. इतर प्रवाशांचा जीव धोक्यात येणारी कोणतीही कृती टाळावी. यानंतर महिलेने जाहीरपणे माफी मागितली आहे. यातून कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता असं महिलेने म्हटलं आहे. त्यामुळे इतरांनीही अशा प्रकारचे स्टंट करू नये असं आवाहन केलं आहे.
रेल्वेच्या नियमानुसार, प्रवाशांना ट्रेनमध्ये अन्न शिजवण्याची परवानगी नसते, मोबाइल चार्जिंग सॉकेटचा उपयोग हाय व्होल्टेज उपकरणांसाठी केला जाऊ शकत नाही. यामुळे आग लागण्याची शक्यता असते. याशिवाय ट्रेनमध्ये चूल पेटवणे, स्ट्रोव्हचा वापर किंवा लहान कुकिंग उपकरणांचा वापर करण्यास परवानही नसते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
