LinkedIn Fresher and Sir: लिंक्डइन (Linkedin) नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम व्यासपीठ आहे. अनेक कंपन्या येथे नोकरीबाबतच्या अपडेट देत असतात. आपल्या क्षेत्रातील संबंधित अनेकांची ओळख देखील येथे होते. एकमेकांच्या ते संपर्कात देखील राहू शकतात. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांचं लिंक्डइन हे आवडतं प्लॅटफॉर्म आहे.
सध्या एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लेखक आणि कॉलमिस्ट साकेत यांनी त्यांच्या X हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. साकेत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "एका फ्रेशरने त्यांना एक मेसेज पाठवला. ज्यामध्ये या फ्रेशरने त्यांना 'हाय साकेत'", असं लिहिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
साकेत यांनी सांगितले की, "हा तरुण 2025 मध्ये त्याच्या कॉलेजमधून उत्तीर्ण होणार आहे. तरी देखील या तरुणाने मला सर न बोलता थेट नावाने संबोधित करत मेसेज केला."
(नक्की वाचा- Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)
तरुणाने मेसेज केला की, "हाय साकेत, आपण दोघे एकाच कॉलेजचे आहोत". यावर साकेत यांनी लिहिले आहे की, "बेटा, तू 2025 मध्ये पास आउट होणार आहेस आणि 1994 मध्ये पास आऊट झालेल्या व्यक्तीशी नाव घेऊन बोलत आहेस. आजही मी 1993 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सिनिअर्सचा सर म्हणून उल्लेख करतो."
पोस्ट व्हायरल
साकेतच्या पोस्टला 1.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'सर' संबोधण्यावरूनही वादविवाद सुरु झाले आहेत. या पोस्टवर एका यूजरने लिहिले आहे की, "त्याने तुम्हाला सर म्हणायला हवे होते का? ही ब्रिटीश संस्कृती आहे. लिंक्डइन हे एक हाय कॉर्पोरेट कल्चरल प्लेस आहे. इथे लोकांना फक्त नावाने हाक मारली जाते."
(नक्की वाचा- RBI Report : 'लाडकी बहीण'सह अनेक योजना बंद होणार? RBI च्या सल्ल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली)
आणखी एका युजरने लिहिले की, "मला सहमत आहे की त्याला सर म्हणू नये. आपल्याला सन्मानजनक नाव घेतलं पाहिजे, जसं की सरकार, माई बाप, मायलॉर्ड, अझिमो-शान-शहेनशाह." असेही काही लोक आहेत जे साकेत बाजून बोलत आहेत.