Good News: चालकांनो! इंटरनेट आणि डेटा नसतानाही नेव्हिगेशन चालणार, 'असं' वापरा Offline Maps

कॅब बुक करायची असेल,नवीन ठिकाणी जायचे असेल किंवा रोड ट्रिप प्लॅन करायची असेल,प्रत्येक ठिकाणी नकाशे उपयोगी पडतात. पण ऑफलाईन मॅप्स कसे वापरायचे? हे अनेकांना माहितीच नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
Offline Maps Navigation Process

Offline Navigation Process : आजच्या काळात नकाशे दाखवणाऱ्या अॅप्स आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. कॅब बुक करायची असेल,नवीन ठिकाणी जायचे असेल किंवा रोड ट्रिप प्लॅन करायची असेल,प्रत्येक ठिकाणी नकाशे उपयोगी पडतात.पण समस्या तेव्हा येते जेव्हा इंटरनेट स्लो होते किंवा पूर्णपणे बंद होते.हिल स्टेशन,दुर्गम भाग, अंडरग्राउंड पार्किंग किंवा दूरच्या ड्राईव्हदरम्यान नेटवर्क गायब होणे, ही सामान्य गोष्टच बनली आहे. अशा वेळी ऑफलाइन नकाशे हा एक लाइफसेव्हर फीचर ठरतो.हा फीचर तुम्हाला इंटरनेट नसतानाही नेव्हिगेशन, रूट्स आणि लोकेशन पाहण्याची सुविधा देतो, ज्यामुळे प्रवास स्मूथ आणि टेन्शन फ्री राहतो.

ऑफलाइन नकाशे म्हणजे काय?

ऑफलाइन नकाशे म्हणजे एखाद्या विशिष्ट भागाचा नकाशा आधीच आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवणे. एकदा नकाशा डाउनलोड झाल्यानंतर, तुम्ही मोबाईल डेटा किंवा वाय-फाय नसतानाही त्या भागात दिशा पाहू शकता आणि रस्ता फॉलो करू शकता. Google Maps, Apple Maps आणि अनेक थर्ड पार्टी अॅप्स ही सुविधा देतात. मात्र, ऑफलाइन मोडमध्ये रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स किंवा लाईव्ह री-रूटिंगसारख्या सुविधा मर्यादित असू शकतात.

नक्की वाचा >> Video: लग्नासाठी उरले होते 2 तास, BF ला रस्त्यावर पाहताच नवरीचं हृदय धडधडलं, कारमधून खाली उतरताच जे घडलं..

ऑफलाइन नकाशे कसे काम करतात?

जेव्हा तुम्ही एखाद्या भागाचा नकाशा डाउनलोड करता, तेव्हा अॅप त्या भागातील रस्ते, गल्ली, लँडमार्क आणि नेव्हिगेशन डेटा तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये सेव्ह करून ठेवते. GPS सिग्नल इंटरनेटशिवायही काम करतात, त्यामुळे फोन तुमचे लोकेशन सहज ओळखतो. त्यानंतर नकाशा अॅप सेव्ह केलेल्या डेटाच्या मदतीने रूट दाखवते आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देते. 

ऑफलाइन नकाशे कसे डाउनलोड करायचे?

ऑफलाइन नकाशे वापरणे खूप सोपे आहे. Google Maps सारख्या अॅपमध्ये तुम्हाला फक्त त्या भागाचे (राज्याचे नाव किंवा थेट शहर/गावाचे नाव) सर्च करायचे असते, त्यानंतर खाली More मध्ये जाऊन Download offline map हा पर्याय निवडायचा असतो. तुम्ही हवे असल्यास एरिया मॅन्युअली झूम करूनही निवडू शकता. यासाठी Maps उघडा आणि तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करून ‘Offline Maps' हा पर्याय निवडा. आता Select your own map बटणावर टॅप करा. येथे दाखवलेल्या आयताकृती बॉक्सच्या आत तुम्हाला डाउनलोड करायचा भाग ठेवा आणि Download वर टॅप करा. डाउनलोड पूर्ण झाल्यावर नकाशा तुमच्या फोनमध्ये सेव्ह होतो आणि ठराविक कालावधीपर्यंत वापरता येतो, ज्याला नंतर अपडेटही करता येते.

Advertisement

नक्की वाचा >> 100 मीटर अंतर राहिलं होतं..तितक्यात कॅब ड्रायव्हरच्या मनात नको ते शिजलं, महिलेनं लगेच व्हिडीओ बनवला अन्..

ऑफलाइन नकाशांचे फायदे

ऑफलाइन नकाशांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विश्वसनीयता. नेटवर्क नसतानाही नेव्हिगेशन चालू राहते. मोबाईल डेटाची बचत होते, बॅटरीचा वापर नियंत्रित राहतो आणि परदेशात प्रवास करताना महागडे रोमिंग चार्ज टाळता येतात. आपत्कालीन परिस्थितीत, जेव्हा इंटरनेट उपलब्ध नसते, तेव्हा ऑफलाइन नकाशे खूप उपयोगी पडतात.

कशाकडे लक्ष द्यावे?

ऑफलाइन नकाशांमध्ये ट्रॅफिक अपडेट्स, रस्ते बंद असणे किंवा व्यवसायाचे लाईव्ह टाइमिंग यासारखी माहिती रिअल टाइममध्ये मिळत नाही. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी नकाशे अपडेट करणे आवश्यक आहे. याशिवाय, डाउनलोड केलेला भाग मर्यादित असतो, त्यामुळे लांब प्रवासासाठी एकापेक्षा जास्त भाग आधीच डाउनलोड करणे चांगले ठरते.

Advertisement