Rachana Ranade Buy New Car : यूट्युबर, अर्थसल्लागार, सीए रचना रानडे यांनी नवी कार घेतल्याची अपडेट इन्स्टाग्रामवर दिली आहे. रचना रानडे यांनी नवीन मर्सिडीज-बेंझ GLE 450 कार खरेदी केली आहे. रचना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ही कार त्यांच्या कुटुंबासाठी एक खास भेट असल्याचे म्हटले आहे. लक्झरी कारचं काही वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न कसं पूर्ण केलं, त्यासाठी काय काय केलं? असं सगळं सविस्तर रचना यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं.
रचना रानडे यांनी इस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, "आम्हाला ही मर्सिडीज GLE 450 भेट म्हणून मिळाली आहे. इतर कोणाकडून नाही - आम्ही ती स्वतःला भेट दिली. वर्षांपूर्वी, 15 ही कार असणे हे फक्त एक स्वप्न होते, मारुती 800 असताना सुरू झालेले हे स्वप्न. ते मोठे... धाडसी... अगदी हास्यास्पदही वाटले. पण आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतला. जोपर्यंत काही दीर्घकालीन स्टॉकमधून मिळणारा आमचा भांडवली नफा पूर्णपणे फंड देऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही लक्झरी कार खरेदी करणार नाही. म्हणून आम्ही संशोधन करण्यात बराच वेळ घालवला."
(नक्की वाचा- Who Is Sanjay Gaikwad : वरणासाठी कँटीनच्या मॅनेजरला मारणारे आमदार संजय गायकवाड कोण आहेत?)
"आम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि करत राहिलो. घाबरू नका. शॉर्टकट नाही. फक्त संयम आणि शिस्त. अखेर, आमचे स्वप्न प्रत्यक्षात आले. ही कार केवळ एक मैलाचा दगड नाही. दीर्घकालीन गुंतवणूक काम करते याचा हा पुरावा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पैशांना वेळ देता तेव्हा तुमचे पैसे परत मिळतात. रिसर्च करा. लक्ष केंद्रित करा. सातत्याने गुंतवणूक करा आणि चक्रवाढीच्या शक्तीवर विश्वास ठेवा", अशी भलीमोठी पोस्ट रचना रानडे यांनी लिहिली आहे.
(नक्की वाचा- Viral Video : 2.67 लाख पगार अन् खर्च फक्त 40 हजार; मुंबईकर तरुणीच्या खर्चाचा तपशील पाहून सगळेच चकीत!)
मर्सिडीज-बेंझ GLE 450 4MATIC ही एक मध्यम आकाराची लक्झरी SUV आहे, जी उत्कृष्ट तंत्रज्ञान, कम्फर्ट आणि पॉवरफुल परफार्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. कारमध्ये सेफ्टीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर, साइड, कर्टन, नी एअरबॅग अशा 9 एअरबॅग्स आहेत. या कारची भारतात एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.12 कोटी रुपये तर मुबंई ऑन-रोड किंमत 1.28 कोटी रुपये आहे.